US Presidential Election 2024: राष्ट्राध्यक्ष पद निवडणूकीसाठी New York मध्ये Ballot Papers वर बंगाली भाषेचाही समावेश

1965 च्या मतदान हक्क कायद्यांतर्गत फेडरल निर्देशानुसार दक्षिण आशियाई अल्पसंख्याक गटांसाठी Language Assistance अनिवार्य केल्याच्या सुमारे दोन वर्षानंतर, 2013 मध्ये राष्ट्राध्यक्षांच्या मतपत्रिकेवर बंगाली भाषेचा समावेश पहिल्यांदाच झाला आहे.

USA Representative Image

अमेरिकेमध्ये आज राष्ट्राध्यक्ष पदाच्या (US Presidential Election 2024) निवडणूकीची धामधूम आहे. कमला हॅरिस ( Kamala Harris) विरूद्ध डोनाल्ड ट्र्म्प (Donald Trump) अशा चुरसीच्या लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुकतेचे आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क (New York) मध्ये 200 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. पण या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीमध्ये त्यांच्या बॅलेट पेपर वर इंग्रजी व्यतिरिक्त चार भाषांचा समावेश आहे. त्यामध्ये भारतीय भाषा बंगालीचा (Bengali) समावेश आहे.

47व्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडीसाठी आज मतदान होताना बॅलेट पेपर वर इंग्रजी सोबत आशियाई भाषा बंगाली, कोरियन, स्पॅनिश, चायनिज यांचा समावेश आहे.

अमेरिकेच्या न्यूयॉर्क मध्ये हिंदी ही प्रामुख्याने बोलली जाणारी भारतीय भाषा असली तरीही न्यूयॉर्क मध्ये बंगाली भाषिक देखील मोठ्या प्रमाणात आहेत. यामध्ये भारतीय आणि बांग्लादेशी नागरिक देखील आहेत ज्यांची रोजची भाषा बंगाली आहे. निवडणूकीमध्ये बंगाली भाषिक परिणामकारक संख्येमध्ये असल्याने आता बंगाली भाषेचा देखील बॅलेट पेपर मध्ये सहभाग करण्यात आला आहे.

1965 च्या मतदान हक्क कायद्यांतर्गत फेडरल निर्देशानुसार दक्षिण आशियाई अल्पसंख्याक गटांसाठी Language Assistance अनिवार्य केल्याच्या सुमारे दोन वर्षानंतर, 2013 मध्ये राष्ट्राध्यक्षांच्या मतपत्रिकेवर बंगाली भाषेचा समावेश पहिल्यांदाच झाला आहे.

Federation of Indian Association चे अध्यक्ष Dr Avinash Gupta यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामुळे भारतीय समुदायाला बाहेर पडून मतदान करण्याला फायदा होणार आहे. US Presidential Elections 2024: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपद निवडणूकीमध्ये Donald Trump यांच्या विजयासाठी भारतात Mahamandelshwar Swami Vedmutinand Saraswati कडून पूजा .

अमेरिकेच्या राजकारणामधील ही 60 वी अध्यक्षीय निवडणूक आहे. यामध्ये 230 मिलियन पात्र मतदार आहेत, परंतु त्यापैकी फक्त 160 मिलियन नोंदणीकृत आहेत. 70 मिलियन हून अधिक लोकांनी पोस्टल मतपत्रिकांद्वारे किंवा लवकर वैयक्तिक मतदान केंद्रांवर मतदान केले आहे.

भारतीय अमेरिकन्सचा निवडणूकीत प्रभाव किती?

आज अमेरिकेत भारतीय वंशाचे 5.2 मिलियनहून अधिक लोक राहतात. भारतीय अमेरिकन आता युनायटेड स्टेट्समधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा स्थलांतरित वर्ग आहे. या वर्षी, भारतीय अमेरिकन लोकांची चर्चा होण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे देशाच्या इतिहासात प्रथमच भारतीय वारसा असलेल्या उमेदवार कमला हॅरिस राष्ट्रध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये आहेत.