COVID19 च्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या H-1B, L-1 व्हिसा नियमांत बदल, अर्जदारांना मिळणार दिलासा

याच कारणास्तव अमेरिकेने गुरुवारी वर्किंग व्हिसा H-1B, L-1 आणि O-1 साठी पर्सनल इंटरव्यू मधून सूट दिली आहे.

H1B Visas | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

कोरोनाचा नवा वेरियंट ओमिक्रॉन (Omicron) याच्या रुग्णांचा आकडा सध्या झपाट्याने वाढत आहे. याच कारणास्तव अमेरिकेने गुरुवारी वर्किंग व्हिसा H-1B, L-1 आणि O-1 साठी पर्सनल इंटरव्यू मधून सूट दिली आहे. खरंतर परराष्ट्र विभागाने आपल्या एका परिपत्रकात असे म्हटले की, सरकारने कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे वीजा धारकांना आपला वीजा रिन्यू करण्यापूर्वीच्या इंटरव्यू द्यावा लागणार नाही आहे. या निर्णयानंतर आता जगभरातील अर्जदारांना दिलासा मिळणार आहे.(Omicron: ख्रिसमसपूर्वी युरोपियन देशात ओमिक्रॉनचा हाहाकार, नेदरलँडमध्ये लॉकडाउनची घोषणा)

परिपत्रकात असे ही म्हटले की, आम्हाला याबद्दल घोषणा करत आनंद होत आहे. कारण कांउंसिलर अधिकाऱ्यांनी अस्थायी रुपात मंजूरी दिली असून ते 31 डिसेंबर, 2022 पर्यंत संबंधित श्रेणींमध्ये काही व्यक्तिगत याचिकेच्या आधारावर नॉन-इमिग्रंट वर्क व्हिसासाठी वैयक्तिक इंटरव्यू मधून सूट दिली जाईल. यामध्ये एच-1 बी व्हिसा, एच-3 व्हिसा, एल व्हिसा, ओ व्हिसा यांचा समावेश आहे. विभागाच्या वीजा प्रोसेसिंग क्षमतेत कोविड19 च्या स्थितीमुळे घट झाली आहे. ज्या प्रमाणे जागतिक प्रवास पुन्हा सुरु होत आहे त्यानुसार आम्ही हे अस्थायी पाऊल उचलत आहोत.(Lockdown in China: शाळा बंद, विमान उड्डाणे रद्द, कोट्यावधी लोक पुन्हा घरात कैद; चीनने Xi'an मध्ये लागू केले कडक लॉकडाऊन)

H1B व्हिसा म्हणजे काय?

अमेरिकेतील कंपन्यांमध्ये दुसऱ्या देशांमधून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना H1B व्हिसा दिला जातो. तर कामानिमित्त ज्यांना येथे रहावे लागते त्यांनाच हा व्हिसा मिळतो. हा व्हिसा एका मर्यादित कालावधीसाठी दिला जातो. परंतु त्याची मुदत संपल्यानंतर तो अर्जदाराला रिन्यू करावा लागतो. म्हणजेच अमेरिकेतील कंपन्या जर एखाद्या विदेशातील नागरिकाला नोकरी देऊ इच्छिते तर त्याला या व्हिसाच्या माध्यमातू काम करता येते.