America Air Strike On Syria: अमेरिकेचा सीरियावर हवाई हल्ला; अल-कायदाचा दहशतवादी मुहम्मद सलाह अल-जबीर हल्ल्यात ठार

काही दिवसांपूर्वी सीरियामध्ये सत्तापालट झाला होता. बशर अल-असद यांचे सरकार तहरीर अल-शाम या बंडखोर गटाने उलथवून टाकले. त्याच वेळी, अहमद अल-शारा यांना देशाचे अंतरिम राष्ट्रपती म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Air Strike प्रतिकात्मक प्रतिमा (PC _ Pixabay)

America Air Strike On Syria: अमेरिकन (America) सैन्याने गुरुवारी वायव्य सीरियामध्ये (Syria) केलेल्या हवाई हल्ल्यात (Air Strike) अल-कायदाशी संबंधित दहशतवादी गटाचा वरिष्ठ सदस्य मुहम्मद सलाह अल-जबीर (Muhammad Salah al-Jubeir) ठार झाला. मुहम्मद सलाह अल-जबीर हा हुर्रस अल-दीन गटाशी देखील संबंधित होता. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, दहशतवाद्यांचे जाळे तोडण्यासाठी हा हवाई हल्ला करण्यात आला.

सीरियातील उठावानंतर बशरची सत्ता गेली -

काही दिवसांपूर्वी सीरियामध्ये सत्तापालट झाला होता. बशर अल-असद यांचे सरकार तहरीर अल-शाम या बंडखोर गटाने उलथवून टाकले. त्याच वेळी, अहमद अल-शारा यांना देशाचे अंतरिम राष्ट्रपती म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. (हेही वाचा -Israeli Gaza War: इस्रायलचा दक्षिण गाझा पट्टीवर हवाई हल्ला, 71 जण ठार; 289 जखमी)

सीरियामधील हालचालीवर अमेरिकेचे लक्ष -

सध्या अहमद अल-शारा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सीरियाचे नेतृत्व करतील. उठावानंतर, बशर-अल-असद आपल्या कुटुंबासह सीरियाला पळून गेला. गेल्या 53 वर्षांपासून सीरियावर असद कुटुंबाचे नियंत्रण होते. सीरियामध्ये सुरू असलेल्या हालचालींवर अमेरिका बारकाईने लक्ष ठेवून आहे. (हेही वाचा - Pakistan Airstrike On Afghanistan: पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर मोठा हवाई हल्ला; 15 जणांचा मृत्यू)

हमासच्या लष्करी प्रमुखाची हत्या -

दरम्यान, इस्रायलने पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासचा लष्करी प्रमुख मोहम्मद दाईफ याला हवाई हल्ल्यात ठार मारले. आयडीएफने या घटनेची पुष्टी केली आहे. हमासचे प्रवक्ते अबू ओबेदा यांनी एका व्हिडिओ निवेदनात दाईफ यांच्या मृत्युची पुष्टी केली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, इस्रायलने जाहीर केले की, त्यांनी 13 जुलै रोजी खान युनूस परिसरात केलेल्या हवाई हल्ल्यात मोहम्मद दयेफला ठार मारले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement