मसूद अजहरला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यासाठी अमेरिकेचा प्रस्ताव, फ्रान्स आणि ब्रिटनचा पाठिंबा
अजहरचे ब्लॅक लिस्टमध्ये नाव अल्यास त्याचे पाकिस्तानमधील दौरे, मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांना चाप बसण्यास मदत होणार आहे.
जैश-ए-मोहम्मह (Jaish-E-Mohammad) या दहशतवादी संघटनेचा सूत्रधार मसूद अजहर (Masood Azhar) ह्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यासाठी अमेरिकेने (America) प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात सादर केला आहे. या प्रस्तावाला फ्रान्स (France) आणि ब्रिटन (Britain) कडून ही पाठिंबा देण्यात आला आहे.
पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या मसूद अजहरला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रस्ताव मांडला होता. मात्र चीन या देशाने नकाराधिकाराचा उपयोग करत मसूद अजहरला वाचवले होते. त्यानंतर पुन्हा आता अमेरिकेकडून अजहर विरुद्ध प्रस्ताव मांडण्यात आला आहे.(हेही वाचा-जैश ए मोहम्मद संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याची संपत्ती होणार जप्त; फ्रान्स सरकारचा निर्णय)
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेने अजहर विरुद्ध हा प्रस्ताव मांडला असल्याचे म्हटले आहे. तर पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ अजहर ह्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात यावे असे या प्रस्तावात म्हटले आहे. यापूर्वी अल-कायदा आणि इस्लामिक स्टेट यांची नावे होती. तर अजहरचे ब्लॅक लिस्टमध्ये नाव अल्यास त्याचे पाकिस्तानमधील दौरे, मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांना चाप बसण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.