चक्क Pornhub वर हा शिक्षक देत आहे गणिताचे धडे; वर्षाला Adult Site वरून कमावतो 2 कोटी रुपये
ते पुढे म्हणतात की, ‘मला पॉर्नहबवर गणित शिकवायचे नव्हते. मला जगाला सांगायचे होते की मी तैवानमधील एक शिक्षक आहे जो कॅल्क्युलस खूप चांगले शिकवू शकतो.’
पॉर्नहब (PornHub) हा असा शब्द आहे जो ऐकल्यावर तुमच्या मनात एकच गोष्ट येते ती म्हणजे पोर्नोग्राफी. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की पॉर्नहब सारख्या प्लॅटफॉर्मचा उपयोग गणित शिकवण्यासाठी करता येईल? आता तुमच्या मनात येईल की, एखाद्याला चक्क पॉर्नहबवर गणिताचे व्हिडिओ का पहावेसे वाटतील? पण असे घडत आहे. पॉर्नहब या साइटवर एक व्यक्ती चक्क गणिताचे धडे देत आहे. तैवानचे एक गणिताचे शिक्षक पॉर्नहबवर गणित शिकवत आहेत.
Changshu असे शिक्षकाचे नाव असून, या ठिकाणी त्याच्या व्हिडिओंना दहा लाखाहून अधिक व्ह्यूज मिळतात. यातून Changshu दरवर्षी सुमारे 2 कोटी रुपये कमावतो. यावरून दिसून येत आहे की, व्यासपीठ कोणतेही असो लोक आपली गणिताची कौशल्ये सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
चांगशुचे changshumath666 नावाचे एक हँडल आहे, जिथे तो गणित शिकवतो. महत्वाचे म्हणजे हे खाते Pornhub वर व्हेरिफाईड केले आहे. चांगशुने XVideos सह इतर पॉर्न साइट्सवरही गणित शिकवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथे त्याला तसा प्रतिसाद मिळाला नाही. इतर अडल्ट साईट सेक्स व्हिडिओ नसलेल्या क्लिपला अनुमती देत नाहीत. तथापि, Pornhub कडे असा कोणताही पक्षपात नाही, किंबहुना त्यांनाही वाटते की त्यांच्या युजर्सनी गणित शिकावे.
चांगशू यांच्या मते, अडल्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर खूप कमी लोक गणित शिकवतात मात्र त्यावर गणित शिकणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. ते म्हणतात की, ‘जेव्हा माझ्या लक्षात आले की, याठिकाणी गणिताचे व्हिडिओ पाहणारे बरेच लोक आहेत, तेव्हा मी या व्यासपीठावर व्हिडिओ अपलोड करायला सुरवात केली.’ (हेही वाचा: Couple-Porn Survey: एकत्र पॉर्न पाहणाऱ्या जोडप्यांच्या Sex Life बाबत रिसर्चमध्ये मोठा खुलासा; पार्टनरसोबत 'तसले' व्हिडिओ पहिल्याने...)
ते पुढे म्हणतात की, ‘मला पॉर्नहबवर गणित शिकवायचे नव्हते. मला जगाला सांगायचे होते की मी तैवानमधील एक शिक्षक आहे जो कॅल्क्युलस खूप चांगले शिकवू शकतो.’
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)