'Sex पूर्वी मास्क घाला, टेस्ट करा' COVID 19 दहशतीच्या पार्श्वभूमीवर थायलंड सरकारचं Valentine's Day सेलिब्रेशन साठी प्रेमी युगुलांना आवाहन

या दिवशी लग्नाचा चांगला दिवस मानला जातो. त्यामुळे सेक्सश्युअली अ‍ॅक्टिव्हिज हा सरकरच्या दृष्टीने एक चिंतेचा विषय बनला आहे.

Romance (Photo Credits: File Photo)

जगभरात कोविड 19 संकटाचा (COVID 19 Pandemic) प्रादुर्भाव आता कमी होत असला तरीही धोका अद्यापही संपला नाही. त्यामुळेच यंदा कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर थायलंड सरकारने वेलेंटाईन डेजच्या (Valentine's Day) पूर्वी प्रेमी युगुलांना सेक्सश्युअल अ‍ॅक्टिव्हिटी दरम्यान कोविड 19 चा प्रसार होणार नाही यासाठी विशेष काळजी घेण्याचं आवाहन केले आहे. मागील पंधरवड्यामध्ये थायलंड (Thailand) मध्ये कोरोना रूग्णांची संख्या दुप्पटीने वाढली आहे.

The Straits Times च्या माहितीनुसार, थायलंडने यंदा जोडप्यांसाठी कडक नियमावली जारी केली होती. त्यामध्ये सुरक्षित सेक्सचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यामध्ये सेक्स दरम्यानही मास्क परिधान करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. एकमेकांचा चेहरा समोरासमोर येईल अशा सेक्स पोझिशन टाळण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. तसेच सेक्स पूर्वी अ‍ॅन्टिजन टेस्ट करण्याचेही आवाहन करण्यात आले होते यामुळे साथीदाराला कोविड 19 चा प्रसार करण्याचा धोका कमी करण्याचा हेतू होता. नक्की वाचा: Coronavirus Pandemic पूर्वी जोडप्यांना Sex मधून अधिक समाधान मिळत होतं- Study .

थायलंड मध्ये आरोग्ययंत्रणांनी हिवाळी वातावरण कोरोना संकटाला अधिक तीव्र करू शकतं असं म्हटलं आहे. कोविड 19 हा सेक्सश्युअली ट्रान्समिटेड आजार नसला तरीही यामध्ये एकमेकांजवळ असणं, सलाईव्हा एक्सचेंज करणं यामधून वायरल पसरू शकतो. असे सांगण्यात आले आहे.

थायलंड मध्ये 14 फेब्रुवारी अर्थात वेलेंटाईन डे दिवशी लग्न करण्याची पद्धत आहे. या दिवशी लग्नाचा चांगला दिवस मानला जातो. त्यामुळे सेक्सश्युअली अ‍ॅक्टिव्हिज हा सरकरच्या दृष्टीने एक चिंतेचा विषय बनला आहे.

एका थायलंड राजकारण्याने नागरिकांना आवाहन करताना तुमचा प्रेम संदेश व्हिडिओ द्वारा प्रियजनांसोबत शेअर करा. अथवा कोविड 19 नियमावलीचं पालन करा असं म्हटलं आहे. लोकांनी प्रेम शेअर करताना त्यामध्येही इतरांप्रती काळजी व्यक्त करत हा प्रेमाचा दिवस साजरा करावा अशी थायलंड सरकारची आशा आहे.