Texas School Shooting: 18 वर्षीय तरूणाकडून अमेरिकेत शाळेत गोळीबार; 18 विद्यार्थी ठार
तसेच ही अमेरिकेतील मागील 10 दिवसांमधील दुसरी घटना आहे.
अमेरिकेतील टेक्सास(Texas) मध्ये एका शाळेत 18 वर्षीय व्यक्तीने ओपन फायरिंग करून 18 मुलं आणि 3 प्रौढांचा जीव घेतला आहे. टेक्सासचे गव्हर्नर Greg Abbott यांनी दिलेल्या माहितीनुसार मारेकरी हा 18 वर्षीय Salvador Ramos आहे. त्याचा पोलिसांकडून प्रतिकार करताना गोळी लागून मृत्यू झाला आहे.
टेक्सासच्या Robb Elementary School मध्ये हा प्रकार झाला असून अमेरिकेच्या इतिहासातील शाळांमधील गोळीबारातील ही अत्यंत विदारक घटना आहे. तसेच ही अमेरिकेतील मागील 10 दिवसांमधील दुसरी घटना आहे. शाळेच्या माहितीनुसार टेक्सास मध्ये 25 मे दिवशी झालेल्या या गोळीबारात ठार झालेली मुलं वयवर्ष 5 ते 11 या वयोगटातील आहेत.
अमेरिकेच्या पंतप्रधानांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी 28 मे पर्यंत राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरवण्याचे आदेश दिले आहेत. हे देखील नक्की वाचा: धक्कादायक! अमेरिका येथील टेक्सास येथे अंदाधुंद गोळीबार; 5 जणांचा मृत्यू, 21 जखमी .
अद्याप या गोळीबारामागील नेमकं कारण समजू शकलेले नाही.18 वर्षीय मारेकर्याने घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी स्वतःच्या आजीला गोळ्या घालून ठार मारले. सॅन अँटोनियोच्या पश्चिमेला सुमारे 130 किमी अंतरावर टेक्सासच्या उवाल्डे शहरातील रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला केला.