Wifi साठी परिवारातील मंडळींची केली हत्या, मृतदेहांसह 3 दिवस स्वत:ला घरात कोंडून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस

स्पेन येथे 15 वर्षीय मुलाने पालकांनी घरातील वायफायचे कनेक्शन बंद केल्याने संतप्त होत आपल्या परिवारातील मंडळींची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Firing | (Photo Credits: Pixabay)

स्पेन येथे 15 वर्षीय मुलाने पालकांनी घरातील वायफायचे कनेक्शन बंद केल्याने संतप्त होत आपल्या परिवारातील मंडळींची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मुलाने आपली आई, वडिल आणि लहान भावावर गोळ्या झाडल्या. हे कृत्य केल्यानंतर त्याने स्वत:ला मृतदेहांसोबत 3 दिवस घरात कोंडून घेतल्याचे ही सांगण्यात आले आहे.(Shocking: नरभक्षक महिलेने खून करून मानवी मांस आणि रक्तापासून बनवला केक; शेजाऱ्यांनाही खाऊ घातला)

अल्पवयीन आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली हे. स्पेनच्या एल्श शहरात ही तिहेरी हत्या करणाऱ्या मुलाने आपला गुन्हा कबुल केला आहे. स्पॅनिश मीडियानुसार, शाळेत उत्तम गुण न मिळण्याह घरातील कामांमध्ये मदत करत नसल्याने मुलाच्या आईने त्याचे वायफाय कनेक्शन काढून टाकले होते. यामुळे मुलगा अधिक संतापला आणि आई, वडिलांसह 10 वर्षीय भावावर गोळ्या झाडल्या. तीन दिवस मृतदेहांसोबत बसून राहिल्यानंतर त्याने या घटनेची माहिती नातेवाईकांना दिली.(Shocking: बायकोचा खून करून तिच्या शरीराचे तुकडे शिजवून खाल्ले; विवाहबाह्य संबंधामुळे संसार झाला उध्वस्त)

दरम्यान, मुलाने आपल्याच परिवारातील मंडळींचा शुल्लक कारणावरुन जीव घेतल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास केला जात आहे. आरोपीला अटक केल्यानंतर त्याने आपणच हे कृत्य केल्याचे म्हटले आहे. तसेच वायफाय कनेक्शन काढून टाकल्याने नाराज होत हा गुन्हा केल्याचे  पोलिसांना मुलाने सांगितले आहे.