भारतीय विद्यार्थीनी Ranjani Srinivasan अमेरिकेतून झाली Self-Deport; जाणून घ्या सेल्फ डिपोर्ट काय असतं? रजनी सोबत काय घडलं
गेल्यावर्षी गाझा येथे झालेल्या इस्रायलच्या युद्धाविरुद्ध अमेरिकन विद्यापीठांमध्ये झालेल्या निदर्शनांना ट्रम्प प्रशासन हमासला पाठिंबा मानते.त्यामधूनच आता त्यांनी ही कारवाई केली आहे.
Ranjani Srinivasan या Columbia University च्या पीएचडी विद्यार्थिनीने तिचा Visa ट्रम्प प्रशासनाने रद्द केल्यानंतर “Self-Deported” चा पर्याय निवडला आहे.रजनीचा Ivy League school मध्ये मागील वर्षी Pro-Palestine protests मध्ये सहभाग असल्याचा अमेरिकन प्रशासनाचा दावा आहे. The US Department of Homeland Security (DHS) कडून आता रजनीचा व्हिसा मागील आठवड्यात रद्द करण्यात आला आहे. तिच्यावर त्यांनी हिंसा आणि आतंकवादाला पाठिंबा दिल्याचा ठपका ठेवला आहे. Hamas ला सपोर्ट केल्याचं त्यांचं म्हणणं असल्याने आता या मुलीने Self-Deport होत अमेरिका सोडली आहे.
कोण आहे रजनी श्रीनिवासन
रंजनी श्रीनिवासन ही कोलंबिया विद्यापीठात शहरी नियोजन विषयात डॉक्टरेटची विद्यार्थिनी आहे तिने F-1 विद्यार्थी व्हिसावर अमेरिकेत प्रवेश केला होता. ही भारतीय नागरिक असून गुजरातमधील अहमदाबाद येथील CEPT विद्यापीठातून डिझाइनमध्ये बॅचलर पदवीधारक आहे. कोलंबिया विद्यापीठाच्या वेबसाइटनुसार, तिला हार्वर्ड विद्यापीठाच्या ग्रॅज्युएट स्कूल ऑफ डिझाइनमध्ये क्रिटिकल कॉन्झर्वेशनमध्ये पदव्युत्तर पदवी मिळविण्यासाठी Fulbright Nehru आणि Inlaks Scholarship मिळाली आहे.
सेल्फ डिपोर्ट काय असतं?
ट्रम्प सरकारने 10 मार्च दिवशी अमेरिकेत राहत असलेल्या बेकायदेशीर स्थलांतरितांना देश स्वतःहून सोडण्यासाठी “self deport” हे नवं अॅप सुरू केले आहे. CBP Home app मध्ये “self- deportation reporting feature” आहे. यामध्ये बेकायदेशीर स्थलांतरित त्यांचं देश सोडून जाण्याचं कारण सांगू शकतात. या अर्जात स्थलांतरितांना विचारले आहे की त्यांच्याकडे "अमेरिका सोडण्यासाठी पुरेसे पैसे आहेत का" आणि त्यांच्याकडे "तुमच्या मूळ नागरिकत्वाच्या देशाचा वैध, कालबाह्य न झालेला पासपोर्ट" आहे का?
DHS Secretary Noem यांनी स्टेटमेंट मध्ये स्पष्ट लिहलं आहे की,सेल्फ डिपोर्ट म्हणजे आताच अमेरिका सोडावा म्हणजे भविष्यामध्ये त्यांना भारतात पुन्हा परतण्यासाठी कायदेशीर संधी मिळू शकते. असे न केल्यास प्रशासनाकडून त्यांना अमेरिकेच्या बाहेर काढले जाईल आणि भविष्यात त्यांना कधीच पुन्हा अमेरिकेमध्ये परतण्याचे पर्याय नसतील.
सीमेवर स्थलांतरितांना कायदेशीर प्रवेश सुलभ करण्यासाठी जे बायडेन सरकारने 2020 मध्ये लाँच केलेले CBP One मोबाईल अॅप होते त्याच्याऐवजी आता या नव्या अॅपची व्यवस्था करण्यात आली आहे. Self-Deportation म्हणजे काय? H-4 Visa वर अल्पवयीन म्हणून अमेरिकेत गेलेल्या अनेकांच्या भवितव्यावर सध्या प्रश्नचिन्ह
मात्र दुसरीकडे इमिग्रेशन वकिलांनी लोकांना अॅपच्या "सेल्फ डिपोर्ट" वैशिष्ट्याचा वापर करण्यापासून सावध केले आहे, कारण ते कदाचित निवास किंवा नागरिकत्वासाठी कायदेशीर मार्ग न देता त्यांचा वैयक्तिक डेटा गोळा करत आहेत.
रजनीने सेल्फ डिपोर्टचा निर्णय का घेतला आहे?
US Department of Homeland Security ने 5 मार्च रोजी "हमास या दहशतवादी संघटनेला पाठिंबा देणाऱ्या कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून" रजनी श्रीनिवासनचा व्हिसा रद्द केला आहे. 11 मार्च रोजी कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन (CBP) होम अॅप वापरून श्रीनिवासनला सेल्फ़ डिपोर्ट करण्यासाठी DHS ने त्यांचे फुटेज देखील दिले आहे.
गेल्यावर्षी गाझा येथे झालेल्या इस्रायलच्या युद्धाविरुद्ध अमेरिकन विद्यापीठांमध्ये झालेल्या निदर्शनांना ट्रम्प प्रशासन हमासला पाठिंबा मानते.त्यामधूनच आता त्यांनी ही कारवाई केली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)