Rafale लढाऊ विमान बनवणारी कंपनी दसॉ चे मालक आणि फ्रान्सचे उद्योगपती Olivier Dassault यांचा हेलिकॉप्टरच्या अपघतात मृत्यू

अशातच आता राफेल विमान बनवणारी कंपनी आणि फ्रान्स चे उद्योगपती ओलिवियर दसॉ (Olivier Dassault) यांच्याबद्दल एक दु:खद बातमी समोर आली आहे.

Olivier Dassault (Photo Credits-Twitter/ Olivier Dassault)

राफेलच्या (Rafale) लढाऊ विमान खरेदीवर जोरदार टीका सरकारवर विरोधकांकडून करण्यात आली. अशातच आता राफेल विमान बनवणारी कंपनी आणि फ्रान्स चे उद्योगपती ओलिवियर दसॉ (Olivier Dassault) यांच्याबद्दल एक दु:खद बातमी समोर आली आहे. तर दसॉ यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. यांच्या निधनाने फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रो यांनी दु:ख व्यक्त केले आहे.(Myanmar: म्यानमारमध्ये लष्करशाही विरोधात जनभावना तीव्र, मोठ्या प्रमाणावर निदर्शने)

दसॉ हे फ्रान्सच्या संसदचे सभासद सुद्धा म्हणून कार्यरत होते. त्याचसोबत उद्योगपती सर्ज दसॉ यांचे सर्वात मोठे सुपुत्र आणि दसॉचे संस्थापक मार्केल दसॉ यांचा नातू ओलिवियर यांचा हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेत मृत्यू झाल्याचे कळताच त्यांना धक्का बसला आहे. ओलिवियर दसॉ 69 वर्षाचे होते. 2020 मध्ये फोर्ब्स च्या सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत दसॉ यांनी 361 वे स्थान मिळवले होते. त्यात त्यांच्या दोन भावांसह बहिणींचा सुद्धा समावेश होता.(भारतीय मूळ असलेल्या Naureen Hassan यांची फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ न्यूयॉर्कच्या VP आणि COO म्हणून नियुक्ती)

Tweet:

दरम्यान, दसॉ सुट्टी घालवण्यासाठी रविवारी गेले होते. त्याचवेळी त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. दसॉ ग्रुपकडून एक एविएशन कंपनी स्थित एक वृत्तपत्र सुद्धा चालवले जाते. ज्याचे नाव ली फिगारो असे आहे. यांची एकूण संपत्ती7.3 अरब अमेरिकी डॉलर आहे.