दिवाळीच्या दिव्याप्रमाणे परदेशातील भारतीयांनी आपली संस्कृती जगभर पोहचवावी - नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदींनी पुढील वर्षी वाराणसीमध्ये होणार्या प्रवासी भारतीय संमेलनाचेही आमंत्रण दिले आहे.
भारत-जपान दरम्यानच्या 13 व्या वार्षिक संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान टोकियोमध्ये पोहचले आहेत. टोकियोमध्ये राहणार्य भारतीय समुहाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी स्थानिकांना भारत-जपान या देशामधील संबंधांचा आढावा दिला आहे. सोबतच अवघ्या 8 दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या शुभेच्छा देताना त्यांनी दिवाळीच्या दिव्याप्रमाणे परदेशातही आपल्या संस्कृतीची प्रभाव जगाच्या कानाकोपर्यात पोहचवण्याचे आव्हान केले आहे.
भारत हा विकसनशील देश आहे. सध्या भारतात 1 जीबी इंटरनेट हा कॉल्डड्रिंक्सच्या बाटलीपेक्षाही स्वस्त असल्याचं म्हटलं आहे. जपानमध्ये 30 हजाराहूनही अधिक भारतीय आहेत. जपानने भारताला स्वातंत्र्यलढ्याच्या काळात मदत केली होती. नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंदांच्या कार्याला जपानने मदत केली आहे. त्यांचे ऋण करोडो भारतीयांच्या मनात कायम असेल असेही मोदींनी म्हटले आहे.
भारत सध्या मोठ्या बदलांमधून जात आहेत. जनधन, आधार, भीम अॅप, रूपी कार्ड अशा नएक अत्याधुनिक डिजिटल ट्रांजेक्शनबाबत अनेकजण उत्सुक आहेत. सध्या भारतात 100 कोटी मोबाईलधारक आहेत. भारतात 1 जीबी डाटा कोल्ड ड्रिंकच्या बॉटलपेक्षा स्वस्त आहे. भारताने कमी खर्चात चांद्रयान, मंगलयान अंतराळात सोडलं. 2022 पर्यंत गगनयान सोडण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे.
नरेंद्र मोदींनी पुढील वर्षी वाराणसीमध्ये होणार्या प्रवासी भारतीय संमेलनाचेही आमंत्रण दिले आहे.
नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या जपान दौर्यावर आहेत. सध्या भारत-जपान बिझनेस लीडर फोरममध्ये मोदी सहभागी झाले आहेत. रविवारी जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबेंची भेट घेतल्यानंतर त्यांनी आज टोकियोत जपानमधील उद्योगपती, परराष्ट्र मंत्र्यांसोबतही भेट घेतली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)