Shocking! माता न तू वैरिणी! नवजात अर्भकाला विमानाच्या टॉयलेटमधील डस्टबिनमध्ये फेकून दिले

नवीन वर्षात हे विमान मादागास्करहून उड्डाण घेतल्यानंतर मॉरिशसची राजधानी पोर्ट लुईस येथे उतरले होते, त्यावेळी या महिलेला ताब्यात घेतले.

Baby | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

जगामध्ये असे अनेक निर्दयी पालक आहेत जे मुल जन्मताच त्याला वाऱ्यावर सोडून देतात. याबाबतच्या अनेक घटना वरचेवर आपल्या कानी येतात, आताही अशीच एक घटना समोर आली आहे जी ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. विमान प्रवासादरम्यान एका महिलेने बाळाला जन्म दिला व तिने या मुलाला चक्क विमानाच्या डस्टबिनमध्ये (Toilet Bin of Plane) फेकून दिले. एअर मॉरिशस (Air Mauritius) विमानाच्या बाथरूममध्ये हे नवजात अर्भक आढळले. सर शिवसागर रामगुलाम आंतरराष्ट्रीय विमानतळावर नियमित सीमाशुल्क तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांना हे नवजात अर्भक आढळून आले.

या प्रकरणी एका 20 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. नवीन वर्षात हे विमान मादागास्करहून उड्डाण घेतल्यानंतर मॉरिशसची राजधानी पोर्ट लुईस येथे उतरले होते, त्यावेळी या महिलेला ताब्यात घेतले. महिलेने सुरुवातीला आपण मुलाची आई असल्याचे नाकारले. त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले, तपासणीमध्ये तिने नुकताच बाळाला जन्म दिला असल्याचे दिसून आले. आता या महिलेला स्थानिक रुग्णालयात पोलिसांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. ही महिला दोन वर्षांच्या वर्क परमिटवर मॉरिशसमध्ये आली होती.

या महिलेला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर, नवजात मुलाला सोडून दिल्याबद्दल तिच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. याआधी अलास्का येथे एका कार्डबोर्ड बॉक्समध्ये एक नवजात अर्भक टाकून दिलेले आढळले होते.  बॉक्समध्ये आईची एक चिठ्ठी होती, ज्यामध्ये मुलाला खायला देण्याचीही आपली ऐपत नसल्याचे तिने लिहिले होते. (हेही वाचा: जुळ्या भावंडांचे अवघ्या 15 मिनिटांच्या फरकामुळे बदलले जन्मवर्ष, जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण)

2020 च्या उत्तरार्धात कतारमध्ये अशीच एक घटना घडली होती. तेथे दोहा हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रसाधनगृहात एक नवजात अर्भक आढळले होते. त्यावेळी अधिका-यांनी नुकतेच जन्म दिलेल्या महिलेचा शोध घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाला निघालेल्या विमानातील अनेक महिलांच्या योनीमार्गाची तपासणी केली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif