Jesse Jane (संग्रहित संपादित प्रतिमा)

लोकप्रिय पॉर्नस्टार जेसी जेनचे (Porn Star Jesse Jane) निधन झाले आहे. 43 वर्षीय जेसी तिचा प्रियकर ब्रेट हसनम्युलरसह घरी मृतावस्थेत आढळून आली. प्रथमदर्शनी मृत्यूचे कारण ड्रग ओव्हरडोज असल्याचे मानले जात आहे. जेसी जेनचे खरे नाव सिंडी हॉवेल होते. जेनने पॉर्न फिल्म इंडस्ट्रीच्या इतिहासातील सर्वात जास्त बजेटच्या चित्रपटात काम केले होते. ओक्लाहोमाच्या मूर येथील घरात जेसीचा मृतदेह तिच्या प्रियकर ब्रेट हसनम्युलरसह पोलिसांना आढळला. अंमली पदार्थाच्या अतिसेवनामुळे दोघांचाही मृत्यू झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. मात्र, मृत्यूची नेमकी वेळ आणि कारण अद्याप समजू शकलेले नाही.

जेसी आणि ब्रेट किती काळ घरात होते हे यावेळी स्पष्ट झालेले नाही. टेक्सासमध्ये जन्मलेली जेसी 100 हून अधिक प्रौढ चित्रपटांमध्ये दिसली आहे. 2002 मध्ये डिजिटल प्लेग्राउंडसह आपल्या करिअरची सुरुवात केल्यानंतर, जेसीने पॉर्न फिल्म्स उद्योगात प्रसिद्धी मिळवली. कंपनीसोबत करार केल्यानंतर काही महिन्यांतच ती शोटाइमच्या फॅमिली बिझनेसमध्ये दिसली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jesse Jane (@thejessejane)

पॉर्न स्टार जेसीने पायरेट्स-2 स्टॅग्नेटीज रिव्हेंजसह अनेक अडल्ट चित्रपटांमध्ये काम केले. या चित्रपटाबद्दल असे म्हटले जाते की, त्याचे बजेट 8 मिलियन डॉलर होते. आतापर्यंत बनवलेल्या सर्वात महागड्या पॉर्न चित्रपटांपैकी हा एक मानला जातो. AVN पुरस्कार आणि XBIZ पुरस्कारांसह अनेक पुरस्कार कार्यक्रम होस्ट केल्यानंतर जेसी अडल्ट चित्रपट उद्योगात एक मोठे नाव बनले. एकेकाळी तिने सेक्स टॉईजची स्वतःची रेंजही लॉन्च केली होती. जेसीची लोकप्रियता वाढत असताना ती प्लेबॉयमध्ये सामील झाली. येथे, तिने नाईट कॉल्स तसेच प्लेबॉय टीव्हीचा नॉटी एमेच्योर होम व्हिडिओज नावाचा एक लोकप्रिय लाइव्ह शो होस्ट केला. (हेही वाचा: Israel Hamas War Update: गाझात 25000 नागरिकांचा मृत्यू, इस्राइल-हमास युद्धात मोठी हानी)

जेसी जेनने 2017 मध्ये प्रौढ चित्रपटांमधून निवृत्ती घेतली. मात्र, दोन वर्षांनी ती पुन्हा या इंडस्ट्रीचा एक भाग झाली. जेसी 2005 ते 2012 पर्यंत रिच टेलरशी लग्नबंधनात होती. जेसी जेनचा बॉयफ्रेंड हसनम्युलरबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. हे जोडपे कधी पासून रिलेशनशिपमध्ये होते हे देखील अद्याप कळू शकलेले नाही. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.