PNB Scam मधील आरोपी 'मेहुल चोकसी'चं लवकरच भारतामध्ये प्रत्यार्पण होण्याची शक्यता; Antigua देशाचं नागरिकत्त्व होणार रद्द

याप्रकरणी भारताअतून फरार असलेल्या मेहुल चोकसीच्या मुसक्या आवळण्यास भारत सरकारला यश मिळालं आहे.

Mehul Choksi (Photo Credits- Twitter)

पंजाब नॅशनल बॅंक घोटाळ्यातील (PNB Scam) आरोपी मेहुल चोकसी (Mehul Choksi) यांच्या समोरील कायद्यातून छुपावाटा काढून परतण्याचे सारे मार्ग बंद झाल्याने आता लवकरच त्याच भारतामध्ये प्रत्यार्पण होणार आहे.एंटीगाचे (Antigua) पंतप्रधान गैस्टन ब्राउन (Gaston Browne) यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहुल चोकसीचे नागरिकत्त्व लवकरच रद्द होणार आहे. भारतामधून फरार झाल्यानंतर मेहुल चोकसी एंटीगामध्ये रहत होता.

गैस्टन ब्राउन यांनी स्थानिक मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, एंटिगा हा देश अपराध्यांसाठी सुरक्षित बनवायचा नाही. त्यामुळे कायदेशीर कारवाई लवकरच पूर्ण करून मेहुल चोकसीला भारतामध्ये पुन्हा पाठवलं जाईल. भारताला मोठा धक्का, देशाबाहेर पळालेल्या मेहुल चोकसी याने भारतीय नागरिकत्व सोडले

मागील सुनावनी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने 1 जुलैपर्यंत मेहुल चोकसी यांच्या वकिलांना हेल्थ रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले होते. तसेच स्पेशल डॉक्टरांचे एक पथक पाठवून त्याची तपासणी करण्यात येणार होती. यामध्ये मेहुल चोकसी एअर अ‍ॅम्ब्युलंसने पुन्हा भारतामध्ये आणण्यस फीट आहेत की नाही? याचा अहवाल देण्यास सांगितले होते. स्पेशलिस्ट टीम 9 जुलैपर्यंत कोर्टात अहवाल सादरकरून 10 जुलैला याबाबत पुढील सुनावणी होणार आहे.