Plane Crash In Moscow: रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये विमान कोसळले; विमानातील 4 प्रवाशांचा मृत्यू
प्रशिक्षण देणारे विमान याक-18टी कोसळल्याने (Plane Crash) 4 जणांना आपला जीव गमवावा लागला. मृतांमध्ये क्रू मेंबर्स आणि ट्रेनी पायलटचा समावेश आहे. विमान एरोबॅटिक्सचा सराव करत असताना हा अपघात झाला.
Plane Crash In Moscow: रशियाची राजधानी मॉस्को (Moscow) मधील कोलोम्ना जिल्ह्यात शनिवारी दुर्दैवी विमान अपघात घडला. प्रशिक्षण देणारे विमान याक-18टी कोसळल्याने (Plane Crash) 4 जणांना आपला जीव गमवावा लागला. मृतांमध्ये क्रू मेंबर्स आणि ट्रेनी पायलटचा समावेश आहे. विमान एरोबॅटिक्सचा सराव करत असताना हा अपघात झाला.
इंजिनमध्ये झाला बिघाड -
रशियाच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाच्या प्रेस ब्युरोनुसार, अपघाताचे कारण विमानाच्या इंजिनमधील तांत्रिक बिघाड होता. इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर विमान नियंत्रणाबाहेर गेले आणि कोलोम्ना येथील एका मोकळ्या मैदानात कोसळले. अपघातानंतर विमानाला आग लागली, ज्यामुळे विमानातील सर्व 4 जण जागीच ठार झाले. तथापी, या अपघातामुळे जमिनीवर कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी झाली नाही. (हेही वाचा -Pakistani Soldiers Killed In Suicide Bomber Attacks: खैबर पख्तूनख्वा येथे लष्कराच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला; 13 पाकिस्तानी सैनिक ठार)
दरम्यान, मॉस्को प्रदेशातील अभियोक्ता कार्यालयाने अपघाताची नेमकी कारणे आणि नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता शोधण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. उड्डाणापूर्वी आवश्यक सुरक्षा मानकांचे पालन केले गेले होते का? याचा देखील तपास करण्यात येणार आहे. (हेही वाचा - Ayatollah Ali Khamenei Warning: इराण पुन्हा अमेरिकन तळांवर हल्ला करेल; अयातुल्ला अली खामेनी यांचा कडक इशारा)
याक-18 टी हे एक हलके प्रशिक्षण विमान आहे, जे माजी सोव्हिएत युनियनच्या देशांमध्ये फ्लाइंग क्लब आणि प्रशिक्षण केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते. हे विमान नागरी वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी ओळखले जाते. तथापि, अशा अपघातांमुळे विमान वाहतुकीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jun 28, 2025 08:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

