Pfizer ची लस ठरली कुचकामी? 6 महिन्यात संपत आहेत शरीरातील Antibodies- US Study मध्ये समोर आली धक्कादायक माहिती
दरम्यान, बहुतेक नर्सिंग होममधील लोकांना फायझर लस मिळाली आहे, कारण ती बाजारात उपलब्ध झालेली पहिली लस होती.
कोरोना विषाणूबाबतच्या (Coronavirus) वेगवेगळ्या लसींसंदर्भात अनेक अहवाल समोर आले आहेत, यामध्ये लसीचा प्रभाव किती काळ असेल हे सांगितले गेले आहे. आता फायझर (Pfizer) लसीबाबत असाच एक अभ्यास आता समोर आला आहे. या अभ्यासामध्ये फायझर लस घेतल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत कोविड-19 विरुद्धच्या अँटीबॉडीज 80 टक्क्यांपेक्षा कमी झाल्या असल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेच्या एका अभ्यासात हे समोर आले आहे. महत्वाचे म्हणजे फायझरचे दोन्ही डोस घेतल्यानंतर या अँटीबॉडीज कमी झाल्याचे आढळले आहे.
अमेरिकेतील केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटी आणि ब्राउन युनिव्हर्सिटीच्या नेतृत्वाखाली झालेल्या अभ्यासात 120 नर्सिंग होम रहिवाशांच्या आणि 92 आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या रक्ताच्या नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये संशोधकांनी विशेषतः Humoral Immunity बाबत तपास केला, ज्याला Antibody-Mediated Immunity असेही म्हटले जाते, ज्यामुळे कोविड-19 ला कारणीभूत असलेल्या सार्स-सीओव्ही-2 विषाणूविरूद्ध शरीराची सुरक्षा मोजली जाते. अभ्यास अहवाल अद्याप प्रकाशित झाला नाही, तो Preprint Server MedRxiv वर पोस्ट केला गेला आहे.
अहवालानुसार, 76 वर्षांचे सरासरी वय असलेल्या ज्येष्ठांमध्ये आणि 48 वर्षे सरासरी वय असलेल्या काळजीवाहकांमध्ये परिणाम सारखेच होते. केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डेव्हिड केनेडी म्हणाले की, लसीकरणानंतर सहा महिन्यांनंतर, या नर्सिंग होममधील 70 टक्के लोकांच्या रक्तामध्ये कोरोनाव्हायरस संसर्ग निष्प्रभावी करण्याची क्षमता कमी असल्याचे दिसून आले. केनेडी म्हणाले की या परिणामांमुळे कदाचित बूस्टर डोसची शिफारस (विशेषत: वृद्धांसाठी) करण्याची आवश्यकता भासू शकते. (हेही वाचा: COVID-19 New Symptoms: तीव्र डोकेदुखी, ऐकण्याची समस्या यांसह 'ही' आहेत कोविड-19 ची नवी लक्षणे)
यापूर्वी टीमने केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की, लसीचा दुसरा डोस घेतल्याच्या दोन आठवड्यांच्या आत, ज्या ज्येष्ठांना आधी कोविड-19 चा संसर्ग झाला नाही, त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज प्रतिसाद कमी होता. दरम्यान, बहुतेक नर्सिंग होममधील लोकांना फायझर लस मिळाली आहे, कारण ती बाजारात उपलब्ध झालेली पहिली लस होती.