Guillain-Barre syndrome, दुर्मिळ न्युरोलॉजिकल सिंड्रोम मुळे Peru ,मध्ये Health Emergency; जाणून घ्या लक्षणं काय?
Guillain-Barre syndrome मध्ये 3 फॉर्म्स आढळले आहेत. जे acute inflammatory demyelinating polyradiculoneuropathy (AIDP), Miller Fisher syndrome आणि acute motor axonal neuropathy आहेत.
दक्षिण अमेरिकेतील पेरू (Peru) देशामध्ये 90 दिवसांची हेल्थ इमरजंसी (Health Emergency ) जाहीर करण्यात आली आहे. मागील काही दिवसात पेरूमध्ये दुर्मिळ न्युरोलॉजिकल सिंड्रोम Guillain-Barre syndrome च्या रूग्णात वाढ झाल्याने ही आरोग्य आणीबाणी जाहीर झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, 182 रूग्ण समोर आले असून 4 जणांचा मृत्यू या डिसऑर्डर मुळे झाला आहे. 27 जूनला पेरू कडून या आजाराच्या रूग्णात वाढ होऊ शकते आणि त्याबाबत त्यांनी अलर्ट दिला होता. Peru President Dina Boluarte यांनी या आजाराच्या पार्श्वभूमीवर आजाराचं निदान, उपचार याद्वारा आरोग्यसेवक आणि रूग्नांची काळजी घेण्यासाठी सुमारे USD 3.27 million चं बजेटही जाहीर केले आहे.
Guillain-Barre syndrome म्हणजे काय?
Guillain-Barre syndrome ही एक दुर्मिळ न्युरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. यामध्ये शरीरातील इम्यू सिस्टिम नर्व्हेस वर हल्ला करते. हातापायामध्ये कमजोरी, मुंग्या आल्यासारखे जाणवते. त्यानंतर बघता बघता पक्षाघात होतो. अनेकांना या स्थितीमध्ये हॉस्पिटल मध्ये उपचार घ्यावे लागतात.
अद्याप या आजारामागील नेमकं कारण समजू शकलेले नाही. रिपोर्ट्सच्या माहिती नुसार यामध्ये2/3 रूग्णांमध्ये कोविड 19 इंफेक्शन किंवा गॅस्ट्रोइंटेंशनल इंफेक्शन किंवा झिका वायरस आधीच्या 6 आठवड्यात दिसला आहे.
Guillain-Barre syndrome ची लक्षणं काय?
- हात, पाय, मनगट, घोट्याजवळ किंवा कधीकधी हात, चेहरा यामध्ये मुंग्या आल्यासारखं जाणवणं.
- पायामधील कमजोरी हळूहळू शरीराच्या वरच्या भागातही जाणवणं त्यामुळे चालणं, पायर्या चढणं कठीण होतं.
- बोलणं, चावणं, गिळणं या नेहमीच्या क्रियांमध्ये अडथळा येणं, डबल व्हिजन, डोळ्यांची हालचाल कठीण होणं.
- तीव्र वेदना जाणवणं, क्रॅम्प जाणवणं प्रामुख्याने हा त्रास रात्रीच्या वेळेस अधिक वाढणं.
- मलमूत्र विसर्जनावर ताबा न राहणं, हृद्याचे ठोके वाढणं, रक्तदाब अचानक कमी-जास्त होणं, श्वास घेण्यास त्रास होणं.
- काही लोकांमध्ये लक्षणं अधिकच जास्त असल्यास पॅरॅलिसिसचा त्रास जाणवणं.
उपचार काय?
Plasmapheresis याच उपचारामधून सध्या GBS रूग्णांना आशेचा किरण आहे. त्यामध्ये शरीरातील सारं रक्त काढून टाकलं जातं. त्यामधील अॅन्टीबॉडिज फिल्टर आऊट केल्या जातात.
Guillain-Barre syndrome मध्ये 3 फॉर्म्स आढळले आहेत. जे acute inflammatory demyelinating polyradiculoneuropathy (AIDP), Miller Fisher syndrome आणि acute motor axonal neuropathy आहेत. Acute inflammatory demyelinating polyradiculoneuropathy (AIDP)हा प्रामुख्याने नॉर्थ अमेरिका, युरोप मध्ये आढळला आहे. यामध्ये स्नायू कमजोर होत आहेत. तर शरीराच्या खालच्या भागातून वरच्या भागाकडे तो पसरत आहे.
Miller Fisher syndrome (MFS),मध्ये पॅरॅलिसिस हा डोळ्यांपासून सुरू होते. हा अमेरिकेत कमी आणि आशियात अधिक आढळला आहे. तर motor axonal neuropathy हा चीन , जपान आणि मॅक्सिको मध्ये अधिक आढळला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)