भारताने इशारा दिल्यावर पाकिस्तान करणार 360 भारतीय कैद्यांची सुटका
या कैद्यांची शिक्षा पूर्ण झाल्यामुळे पाकिस्तानकडून त्यांची सुटका सोमवार, 8 एप्रिलपासून करण्यात येणार आहे.
पाकिस्तान त्यांच्या याब्यात असणाऱ्या 360 भारतीय कैद्यांची (Indian Prisoners) सुटका करणार असल्याची घोषणा काल (शुक्रवारी) केली गेली. या कैद्यांची शिक्षा पूर्ण झाल्यामुळे पाकिस्तानकडून त्यांची सुटका सोमवार, 8 एप्रिलपासून करण्यात येणार आहे. याबाबत मंगळवारी भारताने पाकिस्तानला इशारा दिला होता की, ज्या कैद्यांची शिक्षा पूर्ण झाली आहे त्यांना सोडण्यात येण्याची व्यवस्था ताबडतोब करावी. यावर पाकिस्तानने काल हा निर्णय घेतला. चालू महिन्यात चार टप्प्यांत भारतीय कैद्यांची सुटका केली जाणार असल्याची माहिती पाकिस्तानी परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी दिली.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने, पाकिस्तान उच्च आयोगाला याबाबत लक्ष घालण्यास सुचवले होते. कारण बऱ्याच कालावधीपासून या कैद्यांची सुटला प्रलंबित होती. सध्या पाकिस्तानी तुरूंगांमध्ये 537 भारतीय कैदी आहेत. यातील 483 हे मच्छिमार आहेत तर उरलेले सामान्य नगरील आहेत. तर भारतीय तुरूंगांमध्ये 347 पाकिस्तानी कैदी आहेत. सोमवारी पाकिस्तान यातील 100 कैद्यांची सुटका करणार आहे. (हेही वाचा: चीन- पाकिस्तान भ्रटाचार करण्यात अव्वल, जगातील भ्रष्ट देशांची नावे जाहीर)
भारत आणि पाकिस्तानमधील सागरी सीमेची स्पष्ट आखणी झालेली नाही. त्यातून एकमेकांची सागरी हद्द ओलांडल्याच्या आरोपावरून दोन्ही देशांकडून परस्परांचे नागरिक असणाऱ्या मच्छिमारांना अटक केली जात आहे.