Covid-19: पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांची पत्नी आणि ड्राईव्हरला कोरोनाचा संसर्ग? जाणून घ्या यामागचे व्हायरल सत्य
जगभरात सध्या करोना व्हायरसने (Coronavirus) आपली दहशत पसरवली आहे. चीनमध्ये जन्माला आलेल्या या विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. एकीकडे कोरोना व्हायरसचा बचाव करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोनाबाबत खोट्या माहितीचा (Fake News) प्रसार मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यातच पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांची पत्नी आणि त्यांच्या ड्राईव्हरला कोरोनाचा संसर्ग झाल्याची एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घालत आहे. मात्र, यात काही तथ्थ नसून ही माहिती खोटी असल्याचे उघड झाले आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खोट्या माहितीचा प्रसार केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात आहे. परंतु, तरीदेखील काहीजण नागरिकांमध्ये खोट्या माहितीचा प्रसार करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली खोटी माहिती पसरवली जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका छायाचित्रात इमरान खान यांच्या पत्नीला कोरोनाची लागण- सुत्र , अशा आशायाचे चित्र व्हायरल होत आहे. तसेच टीव्ही स्किनच्या स्लगमध्ये इमरान खान यांच्या ड्राईव्हरलाही कोरोनाची झाल्याची दिसत आहे. परंतु, इमरान खान यांच्या पत्नी आणि ड्राईव्हरला कोरोनाची लागण झाल्याची माहिती पाकिस्तानातील कोणत्याही माध्यमात दाखवण्यात आली नाही. तसेच ही माहिती खोटी असल्याची स्पष्ट झाले आहे. हे देखील वाचा-Covid-19: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची कोरोना विषाणूच्या संकटावर मात
ट्वीट-
छायाचित्राचे पुष्टीकरण-
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या छायाचित्रावर अनेकांनी काही लोकांनी विश्वास ठेवला आहे. तसेच या छायाचित्राची पुष्टी करण्यासाठी काही ट्वीटर वापरकर्त्यांनी हे छायाचित्र पोस्ट करून ही माहिती खरी आहे का? असा प्रश्नही विचारला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानात आतापर्यंत 4 हजार 980 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. तर, कोरोनामुळे 80 लोकांचा मृत्यू झाला आहे.