पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना बॉलिवूड चित्रपट आवडत नसल्याने निर्मात्यांना दिला 'हा' सल्ला

मात्र जेव्हा पाकिस्तानात पंतप्रधान इमरान खान (PM Imran Khan) यांची सत्ता स्थापन झाली तेव्हा भारत आणि पाकिस्तानमधील संबंधिक अधिक दूरावले गेले.

Imran Khan (Photo Credits: Getty Images)

पाकिस्तान आणि भारताचे संबंध अधिक मजबूत नाही हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र जेव्हा पाकिस्तानात पंतप्रधान इमरान खान (PM  Imran Khan) यांची सत्ता स्थापन झाली तेव्हा भारत आणि पाकिस्तानमधील संबंधिक अधिक दूरावले गेले. इमरान खान यांनी नेहमीच जम्मू-कश्मीर हा आपला हिस्सा असल्याचे बोलून दाखवत आहेत. त्यांच्या सरकारमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचा सुद्धा प्रयत्न केला जात आहे. मात्र भारतीय जवानांनी नेहमीच दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. इमरान खान यांच्यामुळे व्यापारात सुद्धा मतभेद झाले आहे. अशाकत आता इमरान खान यांनी पाकिस्तानच्या फिल्म इंडस्ट्रीला असा सल्ला दिला आहे की, त्यामधून असे प्रतित होते त्यांचा भारतावर असलेला द्वेष दिसून येतो.

इमरान खान यांनी देशातील निर्मात्यांना बॉलीवूड सारखे चित्रपट बनवण्यापेक्षा नवे आणि मूळ कंटेटचा वापर करुन सिनेमे तयार करण्याचा आग्रह केला आहे. इस्लामाबाद मध्ये एका लघु चित्रपट समारोहात बोलताना इमरान खान यांनी म्हटले की, सुरुवातीला चुका झाल्या कारण पाकिस्तानात फिल्म उद्योग हा बॉलिवूडपासून प्रेरित आहे. ज्यामुळे अशी संस्कृती निर्माण झाली की, एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राच्या संस्कृती नक्कल करण्यासह ती आजमवण्याची प्रथा सुरु ठेवली.(Biggest Height Difference: उंचीमधील फरकामुळे ब्रिटीश जोडप्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद; जाणून घ्या त्यांची हटके Love Story)

डॉन नुसार इमरान खान यांनी तरुण निर्मात्यांना म्हटले की, जगातील माझ्या अनुभवानुसार फक्त मूळ कंटेटची विक्री होते.कॉपीचे कोणतेही मूल्य नाही. पुढे असे ही त्यांनी म्हटले की, लोक कथित रुपात स्थानिक सामग्रीमध्ये व्यावसायिक रुपाता त्याचा बदल होत नाही तो पर्यंत पाहत त्याकडे पाहत नाहीत.