पाकिस्तान मध्ये जुलै महिन्यापर्यंत COVID19 चा आकडा 12 लाखांवर जाण्याची शक्यता, संक्रमणामुळे 2632 जणांचा बळी

जुलै महिन्याच्या शेवटापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 12 लाखांवर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Coronavirus in India (Photo Credits: PTI)

पाकिस्तान (Pakistan) मध्ये कोविड19 (COVID19) ची प्रकरणे वेगाने वाढत असल्याने असे संकेत मिळत आहेत की, जून महिन्याचा अखेर पर्यंत त्याचा आकडा दुप्पटीने वाढणार आहे. जुलै महिन्याच्या शेवटापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 12 लाखांवर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. येथील एका मंत्र्याने याबाबत त्याचे हे मत व्यक्त केले आहे. सिन्हुआ समाचार एजेंसी यांच्या रिपोर्ट नुसार, रविवारी पार पडलेल्या एका संवाददाता संम्मेलनात संबोधित करत योजना, विकास आणि विशेष मंत्री असद उमर यांनी असे म्हटले की, आपण जूनच्या मध्यावर असून तेथे कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढत आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा 150,000 पोहचण्याच्या मार्गावर आहे.(Coronavirus Updates: जगभरात कोरोना व्हायरसच्या संक्रमितांचा आकडा 76 लाखांच्या पार तर 425,000 हून अधिक लोकांचा COVID19 मुळे बळी- जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी)

उमर पुढे असे म्हटले, अत्यंत दुखाने असे म्हणावे लागते की पाकिस्तानात कोविड19 चा आकडा पुढील महिन्याच्या अखेर पर्यंत दहा लाखांच्या पार जाण्याची शक्यता आहे.(पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह)

तसेच कोरोनाची पाकिस्तान मधील परिस्थिती बाबतचा ही कोणतीच भविष्यवाणी किंवा यामध्ये कोणतीही निश्चितता नाही आहे. जर सरकार आणि जनतेने मिळून याच्या विरोधात काम केल्यास, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होऊ शकते. सोमवारच्या सकाळपर्यंत पाकिस्तानात कोविड19 ची प्रकरणे 139,230 वर पोहचली असून 2632 जणांचा बळी गेला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif