लग्न कधी करतेय? या प्रश्नपासून सुटका मिळवण्यासाठी ऑक्सफर्डच्या विद्यार्थिनीने केलं स्वतःशीच लग्न

भाड्याने लग्नाचा गाऊन विकत घेऊन ऑक्सफर्डच्या विद्यार्थिनीने स्वतःशी लग्न करून कुटुंबाला दिला आश्चर्याचा धक्का

लूलू Photo Credits Youtube

तरूण मुलीने वयाचा विशिष्ट टप्पा पार केला की तिच्यामागे कुटुंबीय हमखास लग्नाचा तगादा लावतात. केवळ भारतीय मुलीचेच कुटुंबीय तिच्या लग्नाच्या मागे नसतात तर परदेशातही करियरच्या मागे धावणार्‍या मुलीचे पालक तिच्या लग्नाच्या मुद्द्यावरून चिंतेत असतात.

32 वर्षीय युगांडाच्या लुलूची कहाणीदेखील अशीच आहे. लूलू लंडनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये क्रिएटीव्ह रायटिंगची विद्यार्थिनी आहे. लूलूचे पालकही तिच्या भविष्याबाबत चिंतेत आहेत. लूलू लग्न कधी करणार ? ही चिंता पालकांना सतत सतावत आहे. यामधूनच तिचे पालक लग्न कधी करणार ? हा तगादा लावत होते. कुटुंबाच्या या प्रश्नापासून सुटका मिळवण्यासाठी अखेर लूलूने लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र लूलूने स्वतःशी लग्न करून सार्‍यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

लूलूच्या वडिलांनी ती 16 वर्षांची असतानाच तिच्या लग्नाचं स्पीच तयार केलं आहे.तर लूलूच्या वाढदिवसादिवशी तिची आई हमखास तिच्यासाठी चांगला नवरा मिळावा म्हणून प्रार्थना करत असते. लूलूने स्वतःची लग्न करून तिच्या परिवारातील आणि मित्रमंडळींमधील लोकांना अचानक आश्चर्याचा धक्का दिला. या प्रसंगानंतर नेमकं काय करावं ? हेच तिच्या कुटुंबियांना समजत नव्हते.

लूलू वेडिंग गाऊन घालून, नव्या नवरीप्रमाणे सजून सार्‍यांसमोर गेली. मात्र हे लग्न मुलाशी नव्हे तर मी माझ्याशीच करत आहे असे तिने सार्‍यांसमोर जाहीर केलं. लूलू ही एक ध्येयवेडी मुलगी आहे. तिला तिचं काम आणि शिक्षण एन्जॉय करायचं आहे. मात्र कुटुंबाकडून सतत लग्नासाठी तगादा असल्याने हा 'सेल्फ मॅरेज'चा पर्याय निवडल्याचं तिनं म्हटलं आहे.

GoFundMe या फेसबूकची लूलूने निर्मिती केली आहे. तिथे लूलूने भविष्यातील शिक्षणासाठी लागणार्‍या पैशांसाठी लोकांकडे मदत मागितली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif