फ्रान्समध्ये इंधन दरवाढी विरोधात आंदोलन, 227 जखमी

विदेशात ही इंधन दरवाढीमुळे संताप व्यक्त केला जात असून या विरुद्ध आंदोलने केली जात आहेत.

फ्रान्स इंधन दरवाढ आंदोलन ( फोटो सौजन्य - ट्विटर )

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे लोक त्रस्त झाले आहेत. तसेच या किंमतीचे पडसाद लोकांवर पडत असून पेट्रोल डिझेलच्या किंमतीबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे विदेशात ही इंधन दरवाढीमुळे संताप व्यक्त केला जात असून या विरुद्ध आंदोलने केली जात आहेत.

फ्रान्स मधील नागरिकांनी पॅरिसचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. त्यावेळी एका आंदोलक महिलेचा मृत्यू झाला असून 227 नागरिक जखमी झाले आहेत. तर फ्रान्समध्ये गेल्या वर्षभरात पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये 23 टक्क्यांनी वाढ झाली होती. मात्र जागतिक पातळीवर इंधनाचे दर कमी होत असाताना ही पेट्रोल डिझेलचे भाव वाढवल्याने फ्रानच्या नागरिकांनी आंदोलन छेडले आहे.

तर या आंदोलनाला फ्रान्सच्या नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. तसेच 2 लाख 80 हजार नागरिक यामध्ये सहभागी झाले असल्याचे फ्रान्सच्या गृहमंत्रालयाने सांगितले आहे.



संबंधित बातम्या