Coronavirus: इंग्लंडचे 76 वर्षीय फुटबॉल वर्ल्ड कप विजेता नॉर्मन हंटर कोरोनाशी झुंज हरले, देशात आजवर 13 हजार पेक्षा अधिक मृत्यूची नोंद

76 वर्षीय नॉर्मन यांचे उपचारा दरम्यान निधन झाले. लीड्स आणि इंग्लंड डिफेंडर हंटर 1966 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होते. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूमुळे आजवर एक लाखाहून अधिक लोक संक्रमित झाले आहेत, तर 13,729 लोकांचा मृत्यू झाला आहे. हंडर यांच्या निधनावर लीड्स युनायटेडने दु:ख व्यक्त केले आहे.

नॉर्मन हंटर (Photo Credit: Getty)

इंग्लंडचे माजी फुटबॉलपटू नॉर्मन हंटर (Norman Hunter) कोरोना व्हायरसशी (Coronavirus) लढाई हरले. 76 वर्षीय नॉर्मन यांचे उपचारा दरम्यान निधन झाले. लीड्स युनाइटेड (Leeds United) आणि इंग्लंड (England) डिफेंडर हंटर 1966 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होते. 10 एप्रिलला हंटरची कोरोना टेस्ट सकारात्मक आली होती, ज्याच्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ब्रिटनमध्ये (United Kingdom) कोरोना विषाणूमुळे आजवर एक लाखाहून अधिक लोक संक्रमित झाले आहेत, तर 13,729 लोकांचा मृत्यू झाला आहे. हंडर यांच्या निधनावर लीड्स युनायटेडने दु:ख व्यक्त केले आहे. क्लब म्हणाला, "हंटरच्या मृत्यूमुळे क्लबचे कुटुंब दु: खी झाले आहे. त्यांचे योगदान कधीही विसरले जाणार नाही. या कठीण काळात क्लब त्याच्या कुटुंबियांसह आणि मित्रांसह आहे." हंटर यांनी वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी डिफेंडर म्हणून लीड्समध्ये प्रवेश केला होता. त्याने क्लबसाठी सर्व स्पर्धांमध्ये 726 सामने खेळले आहेत. (Coronavirus: स्पेन मध्ये 551 नव्या कोरोना बाधितांचा मृत्यू, या देशातील मृतांचा एकूण आकडा 19,000 वर - AFP वृत्त)

त्यांनी लीड्सला दोन वेळा प्रीमियर लीग चॅम्पियन देखील केले आहे. 29 ऑक्टोबर 1943 रोजी जन्मलेल्या नॉर्मन हंटर फुटबॉल लीग 100 लीजेंडमध्येही सहभागी झाले होते. 1962 ते 1976 पर्यंत तो लीड्सकडून खेळले. यानंतर ते 1976 ते 1979 दरम्यान ब्रिस्टल सिटी आणि 1979 पासून 1982 पर्यंत बर्नस्लीकडून खेळले. हंटरने 1964 ते 1965 पर्यंत इंग्लंड अंडर-23 आणि इंग्लंड संघाचे 1965 ते 1974 या काळात प्रतिनिधित्व केले. खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर 1980 ते 1990 या काळात त्यांनी संघाचे व्यवस्थापन पाहिले.

दुसरीकडे, इंग्लिश क्लब लिव्हरपूलच्या दिग्गज केनी डगलिश यांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. या क्षणी, ते सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. दरम्यान, यापूर्वी क्रीडा क्षेत्रात अन्य काही खेळाडूंच्या मृत्यूचेही समोर आले आहे. 28 मार्च रोजी इंग्लंडमध्येच कोरोनामुळे पाकिस्तानचा स्क्वॅश दिग्गज आझम खान यांचे निधन झाले. 1959 ते 1962 दरम्यान सलग चार वेळा ब्रिटिश ओपनचे विजेतेपद जिंकणारे आझम  95 वर्षांचे होते. शिवाय, पाकिस्तानसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारे जफर सरफराज यांचेही निधन झाले.