New Maxico Gun Firing: न्यू मेक्सिको येथे अल्पवयीनाचा गोळीबार, 3 ठार, एक पोलीस अधिकारी जखमी

न्यू मेक्सिकोच्या निवासी भागात घडलेल्या या घटनेत दोन पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत.

सोमवारी न्यू मेक्सिको शहरात एका बंदुकधाऱ्याने केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. अल्बुकर्कच्या वायव्येला सुमारे 180 मैल (290 किलोमीटर) अंतरावर असलेल्या फार्मिंग्टन, न्यू मेक्सिकोच्या निवासी भागात घडलेल्या या घटनेत दोन पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती देताना, पोलिसांनी एका न्यूज ब्रीफिंग दरम्यान सांगितले की, 18 वर्षीय बंदूकधारी व्यक्तीला काही वेळाने चर्चबाहेर गोळ्या घालून ठार करण्यात आले.

फार्मिंग्टन पोलिसांचे प्रवक्ते, शॅनिस गोन्झालेस यांनी वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले की संशयिताने काही वेळ पायी पाठलाग केला होता. त्यानंतर त्याने समोरच्यावर गोळीबार केला. काही क्षणांनंतर, पोलीस कर्मचाऱ्यांसी त्यांचा सामना झाला त्यांने त्यांच्यावरही गोळीबार केला. हल्लेखोराच्या गोळीबाराचा हेतू अस्पष्ट होता.

दरम्यान, दोन जखमी अधिकारी, एक फार्मिंग्टन पोलिस विभागातील आणि एक न्यू मेक्सिको राज्य पोलिसांचा सॅन जुआन प्रादेशिक वैद्यकीय केंद्रात स्थिर प्रकृतीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. महापौर नाट डकेट यांनी एका निवेदनात म्हटले आहे की दोघांनाही गोळी लागली होती परंतु त्यांच्या जखमा जास्त गंभीर नाही. चार जखमी नागरिकांची प्रकृती कळू शकलेली नाही.