NASA च्या ऐतिहासिक मिशनमध्ये मुंबईकर श्याम भास्करन यांची भरीव कामगिरी

मुंबईतील माटुंगा परिसरात 1963 साली त्यांचा जन्म झाला.

NASA NewHorizons (Photo Credits: Twitter)

कल्पना चावला, सुनिता विल्यम्सनंतर नासामध्ये श्याम भास्करन या भारतीय व्यक्तीची कामगिरी गौरवास्पद ठरली आहे. मुंबईकर असलेल्या श्याम भास्करन (Shyam Bhaskaran) यांचा नासाच्या ऐतिहासिक फ्लायबाय मिशनमध्ये समावेश आहे. हे मिशन श्याम नियंत्रित करतात. 1 जानेवारी 2019 दिवशी आपल्या सोलर सिस्टीममधील सर्वात दूर असलेल्या अल्टिमा थुले (Ultima Thule) या जवळून हे मिशन घेऊन जाण्यास नासाला यश मिळालं आहे.

न्यू होरायझन (New Horizon spacecraft) जानेवारी 2006 मध्ये पृथ्वीवरून सोडण्यात आलं. यामधील फ्लायबाय मिशन नेविगेट करण्यामध्ये श्याम यांची महत्त्वाची भुमिका आहे. नासामध्ये श्याम जेट प्रोप्लशन लॅबेरेटरीमध्ये (Jet Propulsion Laboratory) काम करतात. मुंबईतील माटुंगा परिस्रात 1963 साली त्यांचा जन्म झाला.

न्यू होरायझन द्वारा काय मिळणार ?

आपल्या सोलर सिस्टीममधील सर्वात दूर असलेल्या अल्टिमा थुले जवळून न्यू होराइजन घेऊन जाण्यास नासाला यश मिळाल्याने आता त्याचा आकार, रंग, रूप यांचा अंदाज येणार आहे. आजतागायत हे ऑब्जेक्ट दूर असल्याने आणि अंधार असल्याने त्याच्याबद्दल अनेक गोष्टी गूढ बनून राहिल्या होत्या. आता याचा उलगडा करण्यास शास्त्रज्ञांना यश मिळणार आहे. 1 जानेवारीला न्यु होरायझन हे स्पेसक्राफ्ट अल्टिमा थुले जवळून सुमारे 3500 किमीवरून उडवण्यात यश आलं आहे.लवकरच फोटो शास्त्रज्ञांना मिळणार आहेत.

14 जुलै 2015 ला प्युटो ग्रहाचा शोध लागला. या ग्रहापासून अल्टिमा थुले सुमारे 6 बिलियन किलोमीटर दूर आहे.