कोरोनाची भिती! व्हॉट्सअपवर आलेल्या व्हिडिओ पाहून माय-लेकी सलग चार दिवस प्यायल्या स्वत:चे मुत्र

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर माध्यमातून कोरोना संबंधित अनेक खोट्या बातम्यांचा प्रचार होत असल्याचे दिसत आहे.

Urine | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर माध्यमातून कोरोना संबंधित अनेक खोट्या बातम्यांचा प्रचार होत असल्याचे दिसत आहे. अशाच प्रकारच्या खोट्या बातमीला लंडनची एक महिला बळी पडली आहे. या महिलेला व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ आला होता. ज्यात कोरोनापासून बचाव करण्यासाठी स्वत:चे मुत्र पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याच खोट्या माहितीला बळी पडून एका महिलेने तिच्या मुलीसह सलग चार दिवस स्वत:चे मुत्र प्यायल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एक महिलेला तिच्या नातेवाईकांनी व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ पाठवला होता. या व्हिडिओत स्वत:चे मुत्र प्यायल्याने कोरोना बरा होतो, असा दावा करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित महिलेने तिच्या मुलीसह सलग चार दिवस स्वत:चे मुत्र प्यायले, अशी माहिती हेल्थवॉच सेंट्रल वेस्ट लंडनमधील तपासकर्त्यांना सांगितले. तसेच ही संपूर्ण माहिती खोटी असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. याशिवाय, नागरिकांना अशाप्रकारच्या अफवांना बळी न पडण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे. हे देखील वाचा- WHO च्या टीमला वूहानमध्ये आढळले Coronavirus चे 13 वेगवेगळे व्हेरिएंट; शहरातील कोरोनाचा कहर अंदाजापेक्षा 500 टक्के जास्त होता

कोरोना संकट काळात अनेक खोट्या बातम्यांचा प्रसार केला जात आहे. धक्कादायक म्हणजे, कोरोनाच्या धास्तीने अनेकजण अफवांना पळी पडले आहेत. तसेच सोशल मीडियावर नागरिकांची फसवणूक करणाऱ्या समाज कंटकांविरोधात आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र, तरीही खोट्या बातम्यांचा प्रसार अजूनही सुरु असल्याचे दिसत आहे.