पाकिस्तान: कुलभूषण जाधव यांना Consular Access मिळाला; भारतीय राजदूत गौरव अहुवालिया घेणार भेट

भारताकडून गौरव अहुवालिया (Gaurav Ahluwalia) कुलभूषण जाधव यांची भेट घेणार आहेत. ही भेट मोकळ्या आणि शांत वातावरणात होईल अशी अपेक्षा भारताकडून व्यक्त करण्यात आली आहे.

पाकिस्तान: कुलभूषण जाधव यांना Consular Access मिळाला; भारतीय राजदूत गौरव अहुवालिया घेणार भेट
Kulbhushan Jadhav (File Image)

भारतीय नागरिक आणि नौसैनेचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (International Court Of Justice) फाशीची शिक्षा स्थगित करत बचाव करण्यासाठी आवश्यक काऊन्सिलर अ‍ॅक्सिस (Consular Access) देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कुलभूषण जाधव (Kulbhushan Jadhav) यांना आज पाकिस्तानात भारतीय राजदूत भेटणार आहेत. काल याबाबत पाकिस्तानकडून माहिती दिल्यानंतर आज (2 सप्टेंबर) भारतीय अधिकार्‍यांकडूनही याबाबतच्या वृत्ताला पुष्टी देण्यात आली आहे. भारताकडून गौरव अहुवालिया (Gaurav Ahluwalia) कुलभूषण जाधव यांची भेट घेणार आहेत. ही भेट मोकळ्या आणि शांत वातावरणात होईल अशी अपेक्षा भारताकडून व्यक्त करण्यात आली आहे.

मागील 3 वर्षांपासून भारत कूलभूषण जाधव प्रकरणामध्ये काऊन्सिलर अ‍ॅक्सिस मिळावा यासाठी प्रयत्न करत होता. त्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दार ठोठावले. 17 जुलैला हेग मध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला बिनशर्त काऊंसल अ‍ॅक्सेस देण्याचे आदेश दिले आहेत. कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती; आंतरराष्ट्रीय न्यायालयात निकाल भारताच्या बाजूने, पाकिस्तानला दणका

ANI Tweet 

कुलभूषण जाधव हे सध्या पाकिस्तानातील कारागृहात आहेत. पाकिस्तानने दावा केला आहे की, पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या जवानांनी 3 मार्च 2016 रोजी हेरगिरी आणि दहशतवाद अशा दोन्ही आरोपाखाली त्यांना बलूचिस्तान येथे अटक केले. हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानातील मिलिटरी कोर्टाने एप्रिल 2017 मध्ये कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती.

(The above story first appeared on LatestLY on Sep 02, 2019 11:39 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).