कोविड-19, दहशवादाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सह 'या' देशांमध्ये प्रवास करण्याबाबत फेरविचार करावा; जो बायडन प्रशासनाने जारी केली नवी Travel Advisory
या नव्या सूचनांनुसार, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये जाण्याचा विचार करत असलेल्या नागरिकांनी फेरविचार करण्याचा सल्ला अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.
कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव आणि दहशतावादी हल्ले यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने नवी ट्रॅव्हल अॅडव्हायजरी (Travel Advisory) जारी केली आहे. या नव्या सूचनांनुसार, पाकिस्तान (Pakistan) आणि बांगलादेशमध्ये (Bangladesh) जाण्याचा विचार करत असलेल्या नागरिकांनी फेरविचार करण्याचा सल्ला अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे. तसंच नागरिकांनी अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) जाऊ नये असंही परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, जो बायडन यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर अमेरिकन नागरिकांच्या प्रवास संदर्भातील सूचनांमध्ये बदल करण्यात आला आहे.
कोविड-19, दहशतवाद आणि जातीय हिंसाचार या बाबी लक्षात घेता पाकिस्तानमध्ये प्रवास करण्याच्या विचार करत असलेल्यांनी पुर्नविचार करण्याचा सल्ला अमेरिकाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आला आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तान आणि बांग्लादेशातही प्रवास टाळण्याच्या सूचना परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत. गुन्हेगारी, दहशतवाद आणि अपहरण यामुळे बांग्लादेशात जाण्यासंदर्भात फेरविचार करावा, असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. तर कोविड-19, गुन्हेगारी, दहशतवाद, अशांतता, अपहरण आणि सशस्त्र संघर्ष सुरु असलेला अफगाणिस्तानही प्रवासाच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर जो बायडन प्रशासनाने ब्राझील, आर्यलॅण्ड, ब्रिटन या सोबतच युरोपियन देशांमधून अमेरिकेत येणाऱ्या प्रवाशांवर औपचारिकरित्या बंदी घातली आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेसाठीही हा नियम लागू करण्यात आला आहे. (अमेरिकेचे नवे अध्यक्ष Joe Biden अॅक्शन मोडमध्ये; पहिल्याच दिवशी Donald Trump यांचे निर्णय मोडीत काढून घेतले काही महत्वाचे निर्णय)
कोरोना व्हायरस संकटाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला. कोरोना बाधितांचा आकडा, मृतांची संख्या अमेरिकेत सर्वाधिक आहे. त्यामुळे संकट अधिक वाढू नये या पार्श्वभूमीवर जो बायडन प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. दरम्यान, 20 जानेवारी रोजी जो बायडन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ ग्रहण केली आणि सत्तेत आल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांनी हा मोठा निर्णय जाहीर केला आहे.