आता Amazon सुद्धा अंतराळ मोहिमेत सामील; Jeff Bezos यांनी सादर केले चंद्रावर झेपावणारे Moon Lander

अॅमेझॉन आणि स्पेस कंपनी ब्लू ओरिजिन (Blue Origin) यांचे अध्यक्ष जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनी गुरुवारी आपल्या पहिल्यावहिल्या चंद्रावर उतरणाऱ्या यंत्राचे (Lunar Lander) चे अनावरण केले

Jeff Bezos unveiled a Lunar Lander (Photo Credit : Youtube)

अमरिकेने नुकतीच त्यांची चंद्रमोहिमेची माहिती जगाला दिली, इस्रोने आपल्या चंद्रमोहिमेची तारीख घोषित केली. आता ऑनलाईन शॉपिंगमध्ये आपला दबदबा निर्माण करणारी कंपनी अॅमेझॉन (Amazon)  सुद्धा अंतराळ मोहिमेत उतरत असल्याची बातमी आहे. अॅमेझॉन आणि स्पेस कंपनी ब्लू ओरिजिन (Blue Origin) यांचे अध्यक्ष जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनी गुरुवारी आपल्या पहिल्यावहिल्या चंद्रावर उतरणाऱ्या यंत्राचे (Lunar Lander) चे अनावरण केले. 2024 पर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उपकरणे आणि संभाव्यत: मानवी  वाहतूक करण्यासाठी या यंत्राचा वापर होणार आहे.

वॉशिंग्टन (Washington) येथे जेफ यांनी या यंत्राचे सादरीकरण केले. या यांत्राबाबत त्यांनी कोणतीही तारीख सांगितली नसली तरी, नुकतेच ट्रम्प यांनी घोषणा केलेल्या चंद्रमोहिमेच्या पूर्वी हे चंद्रावर जाण्यासाठी तयार असेल असे जेफ यांनी सांगितले. 2016 मध्ये या प्रकल्पाला सुरुवात झाली होती. हे वैज्ञानिक उपकरण, चार लहान रोव्हर्स आणि मनुष्यांसाठी भविष्यातील दबावात्मक वाहन वाहण्यास सक्षम असेल. (हेही वाचा: अमेरिकेची अंतराळ मोहीम; चंद्रावर पाऊल ठेवणारी जगातील पहिला महिला ठरणार अमेरिकन)

ब्लू ओरिजिन पूर्णतः इंधनासह भारित केल्यामुळे, त्याचे वजन सुमारे 33,000 पौंड (15,000 किलोग्रॅम) इतके भरेल, तर चंद्रावर उतरताना त्यातील जवळजवळ 7,000 पाउंड कमी होईल. चंद्रावर इन्फ्रास्ट्रक्चर उभारणे, जाण्यासाठी नवीन सुविधा निर्माण करणे आणि त्याद्वारे अंतराळ यात्रा स्वस्त करणे हा यामागील उद्देश आहे. सध्या बेझोस यांनी चांद्रमोहीम किंवा अन्य अंतराळमोहिमांसाठी पायाभूत सुविधांवर भर देण्याचे ठरवले आहे.

यावेळी जेफ यांनी काही कल्पना चित्रे सादर केली, त्यामध्ये चंद्रावर मनुष्यवस्ती आणि हिरवळ असल्याचे दाखवण्यात आले आहे. दरम्यान, ब्लू ओरिजिन हे कंपनी नासाच्या सलग्न काम करीत आहे. नासाने यासाठी काही फंडदेखील ब्लू ओरिजिनला दिला आहे. सध्याची प्रगती पाहता नासाच्या येणाऱ्या चंद्रमोहिमेमध्ये या दोन्ही संस्था एकत्र अंतराळात झेप घेतील अशी आशा आहे.