Israel Iran Conflict: इराणचे लष्करी प्रमुख Ali Shadmani ठार, आयडीएफचा दावा

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी आणि अयातुल्ला अली खामेनेई यांचे निकटवर्तीय सल्लागार अली शादमानी ठार झाल्याचा इस्रायली लष्कराचा दावा. इस्रायल-इराण संघर्ष पाचव्या दिवशी प्रवेशला.

Israel Iran Conflict: इराणचे लष्करी प्रमुख Ali Shadmani ठार, आयडीएफचा दावा
Representative Image (Photo Credit: X/@IDF)

इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) ने मंगळवारी (17 ऑक्टोबर) दावा केला की, त्यांनी इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी आणि सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांचे निकटवर्तीय सल्लागार अली शादमानी (Ali Shadmani) यांना ठार केले आहे. हा हल्ला इस्रायली हवाई दलाने (Israeli Air Force-IAF) केंद्रस्थानी तेहरानमध्ये अचूक माहितीच्या आधारे केल्याचे आयडीएफने सांगितले. इस्त्रायल आणि इराण (Israel Iran Conflict) यांच्यात पाठिमागील काही दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. सलग पाचव्या दिवशीही तो सुरुच आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले प्रतिहल्ले सुरु आहेत.

तेहरानमध्ये हवाई हल्ल्यात सल्लागार ठार?

आयडीएफने X (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले, पाच दिवसांत दुसऱ्यांदा, आयडीएफने इराणच्या युद्धकालीन चीफ ऑफ स्टाफचा खात्मा केला आहे. अली शादमानी, इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी आणि खामेनेई यांचे निकटवर्तीय सल्लागार, यांना केंद्रस्थानी तेहरानमध्ये हवाई हल्ल्यात ठार मारण्यात आले. इस्रायल लष्कराने असेही स्पष्ट केले की, इराणी गट व प्रॉक्सी संघटनांविरोधातील युद्ध अनेक आघाड्यांवर सुरूच आहे. गाझामधील खान युनिस येथे याअंतर्गत एक लक्ष्यित मोहिम राबवण्यात आली, जिथे हमासच्या भुयारी संरचनेचा शोध घेण्यात आला. (हेही वाचा, Iran-Israel War: इराणमध्ये मोठा विध्वंस! तेहरानच्या लष्करी तळावर हल्ला; इस्रायलने बंकरवर टाकला बॉम्ब)

मोहम्मद सीनवारचा मृतदेह सापडला?

आयडीएफच्या मते, इराणी प्रॉक्सीजविरुद्धचे आमचे युद्ध सर्व आघाड्यांवर सुरू आहे. गेल्या दोन आठवड्यांत आमच्या जवानांनी खान युनिसमधील युरोपियन रुग्णालयाजवळ हमासच्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या भुयारी संरचनेचा शोध घेऊन त्याचे नकाशांकन केले. या परिसरात मोहम्मद सीनवारचा मृतदेह सापडला. सुमारे 250 क्यूबिक मीटर काँक्रीट ओतून आम्ही हा बोगदा बंद केला. ही कारवाई अत्यंत अचूकतेने आणि रुग्णालयाच्या इमारतीला इजा न होता पार पाडण्यात आली.”

इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता पाचव्या दिवशीही सुरुच असून दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्रे डागणे सुरू आहे. CNN च्या वृत्तानुसार, आतापर्यंत इराणमध्ये 224 लोकांचा मृत्यू झाला असून इस्रायलमध्ये 24 जण मृत्युमुखी पडले आहेत.

..तर संघर्ष संपुष्टात येईल!, इस्त्राईलचा दावा

दरम्यान, ABC News शी बोलताना इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले की, अयातुल्ला अली खामेनेई यांना लक्ष्य केल्यास हा संघर्ष संपुष्टात येईल, वाढणार नाही. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचा खामेनेई यांना ठार करण्याचा प्रस्ताव नाकारला होता का, नेतान्याहू म्हणाले, “हा निर्णय संघर्ष वाढवणारा नाही, तो संघर्ष समाप्त करणारा आहे.”

आयडीएफचा दावा

नेतान्याहू यांनी इराणवर मध्यपूर्वेत दीर्घकाळ हिंसाचार पसरवल्याचा आरोप करताना म्हटले की, गेल्या पन्नास वर्षांत या शासनाने संपूर्ण मध्यपूर्वेत दहशत पसरवली आहे. त्यांनी सौदी अरेबियातील अरामको तेल प्रकल्पांवर हल्ले केले; दहशतवाद आणि षड्यंत्र सर्वत्र पसरवले आहे. ते म्हणाले, ही कायमची लढाई इराणला हवी आहे आणि ते आपल्याला अण्वस्त्र युद्धाच्या उंबरठ्यावर आणत आहेत. इस्रायल हे थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याला केवळ या दुष्ट शक्तींना रोखूनच हा संघर्ष संपवता येतो.

इराणसोबत सर्व आघाड्यांवर संघर्ष सुरु- इस्त्रायल

जेव्हा नेतान्याहू यांना विचारण्यात आले की, इस्रायल इराणच्या सर्वोच्च नेत्याला लक्ष्य करणार का, ते म्हणाले, आम्ही जे काही करणे आवश्यक आहे, ते करत आहोत. ते पुढे म्हणाले, “मी तपशील उघड करू शकत नाही, पण आम्ही त्यांच्या शीर्ष अणुविज्ञान तज्ञांना लक्ष्य केले आहे. हे मूलतः हिटलरच्या अणुकार्यक्रमासारखेच आहे. गेल्या आठवड्यात इस्रायलने “Operation Rising Lion” नावाची व्यापक लष्करी कारवाई राबवली होती, ज्यामध्ये इराणच्या अणु व लष्करी केंद्रांवर जोरदार हल्ला करण्यात आला. प्रत्युत्तरादाखल इराणनेही इस्रायली शहरांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला होता.

(The above story first appeared on LatestLY on Jun 17, 2025 03:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).