Iran-Israel War: इराणमध्ये मोठा विध्वंस! तेहरानच्या लष्करी तळावर हल्ला; इस्रायलने बंकरवर टाकला बॉम्ब
मंगळवारी इस्रायलमधील तेल अवीव आणि जेरुसलेममध्ये मोठ्या प्रमाणात स्फोट ऐकू आले. इस्रायलच्या अनेक भागात हवाई हल्ल्याचे सायरन वाजले. इराणी सैन्याने इस्त्रायलमधील अनेक शहरांवर क्षेपणास्त्र डागले. ज्यामुळे मोठा स्फोट झाला.
Iran-Israel War: इस्रायल आणि इराणमधील संघर्ष (Israel-Iran Conflict) वाढला असून आता पाचव्या दिवशीही हवाई हल्ले (Air strikes) सुरू आहेत. सोमवारी इस्रायलने इराणी सरकारी टीव्हीच्या मुख्यालयावर बॉम्बस्फोट केले. दोन्ही देशांमधील युद्ध आता आणखी वाढताना दिसून येत आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, इराणने अणु महत्त्वाकांक्षेवर करार करायला हवा होता, ज्यामुळे इस्रायलसोबत क्षेपणास्त्र हल्ले रोखता आले असते. ट्रम्पने अमेरिकन नागरिकांना तेहरान सोडण्याचे आवाहन केले. मध्य पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता, ट्रम्पने सोमवारी कॅनडामधील ग्रुप ऑफ सेव्हन शिखर परिषदेतून परतण्याची घोषणा केली. इस्त्रायलने तेहरानच्या लष्करी तळावर हल्ला केला असून इराणमधील बंकरवर बॉम्ब टाकला. यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
इस्रायलमध्ये तेल अवीव आणि जेरुसलेममध्ये मोठा स्फोट -
दरम्यान, मंगळवारी इस्रायलमधील तेल अवीव आणि जेरुसलेममध्ये मोठ्या प्रमाणात स्फोट ऐकू आले. इस्रायलच्या अनेक भागात हवाई हल्ल्याचे सायरन वाजले. इराणी सैन्याने इस्त्रायलमधील अनेक शहरांवर क्षेपणास्त्र डागले. ज्यामुळे मोठा स्फोट झाला. (हेही वाचा -Iran Israel Tension: इस्रायलसोबतच्या संघर्षादरम्यान इराणमध्ये अडकले 10 हजार भारतीय; स्थलमार्गाने बाहेर काढण्याची योजना)
इस्रायलने इराणवरही हल्ले वाढवले -
आज इस्रायलने इराणवर हल्ले वाढवले आहेत. गेल्या 24 तासांत इस्त्रायलने इराणच्या अनेक शहरांवर हल्ले केले आहेत. इस्रायली लढाऊ विमानांनी तेहरान व्यतिरिक्त काझविन, अहवाज, शिराझ, परचिन, मशहाद, नतान्झ, खोरमाबाद, अरकवर हवाई हल्ले केले आहेत. तथापि, इराणने आतापर्यंत इस्रायलवर 370 हून अधिक क्षेपणास्त्रे आणि शेकडो ड्रोन डागले आहेत. (हेही वाचा: Advisory for Indians: इराणमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी; आपत्कालीन परिस्थितीत दूतावासाशी संपर्क साधण्याचे आवाहन)
भारताचे तेहरानमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आवाहन -
याशिवाय, भारताचे तेहरानमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आवाहन केले आहे. तेहरानमध्ये असलेल्या आणि दूतावासाच्या संपर्कात नसलेल्या सर्व भारतीय नागरिकांना तात्काळ तेहरानमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा आणि त्यांचे स्थान आणि संपर्क क्रमांक द्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

