Natasha Perianayagam, 13 वर्षीय भारतीय वंशाची विद्यार्थीनी सलग दुसर्यांदा World’s Brightest’ Student
नताशाला मोकळ्या वेळेमध्ये चित्र काढणं, JRR Tolkien ची पुस्तकं वाचणं आवडते.
Natasha Perianayagam ही भारतीय वंशाची विद्यार्थीनी Johns Hopkins Center For Talented Youth च्या जगातील सर्वात प्रतिभावान विद्यार्थ्यांच्या (World’s Brightest’ Student) यादीमध्ये सलग दुसर्या वर्षी झळकली आहे. 76 विविध देशांमधून 15 हजार विद्यार्थ्यां मधून तिची निवड झाली आहे. 13 वर्षीय Natasha Perianayagam अमेरिकेच्या न्यू जर्सी मध्ये Florence M. Gaudineer Middle School मध्ये शिकते.
Natasha Perianayagam ग्रेड 5 ची विद्यार्थीनी आहे. तिने Johns Hopkins Center For Talented Youth (CTY) test देखील दिली आहे. तिचे verbal आणि quantitative test scores प्रगत ग्रेड 8 च्या कामगिरीसाठी 90 पर्सेंटाइलच्या बरोबरीचे होते. त्यामुळे तिचे या यादीमध्ये नाव आले आहे. SAT, ACT, School and College Ability Test सह घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये अव्वल कामगिरी केली आहे.
नताशाचे पालक भारतातील चैन्नई प्रांतातील आहे. नताशाला मोकळ्या वेळेमध्ये चित्र काढणं, JRR Tolkien ची पुस्तकं वाचणं आवडते. तिने 2021-2022 शैक्षणिक वर्षात CTY मध्ये 76 वेगवेगळ्या राष्ट्रांतील इतर 15,300 विद्यार्थ्यांसह प्रवेश केला, असे विद्यापीठाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
जगभरातील अशा मुलांना ओळखण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक क्षमतेची संपूर्ण माहिती देण्यासाठी, CTY वरच्या-श्रेणी-स्तरीय चाचणीचा वापर केला जातो.