भारतीय वंशाचा अमेरिकन इंजिनियरने कामाच्या ठिकाणी नातेवाईकाशी हिंदी मधून संवाद साधल्याने गमावली नोकरी - रिपोर्ट्स
AL.com नुसार, Anil Varshney यांनी या खटल्याद्वारा त्यांच्या पूर्वीच्या कामाच्या ठिकाणी त्यांना पुन्हा रूजू करण्यात यावं असं म्हटलं आहे.
78 वर्षीय भारतीय वंशाच्या अमेरिकन इंजिनियरच्या दाव्यानुसार, तो हिंदी मध्ये मरणाला टेकलेल्या नातेवाईकाशी फोन वर बोलत असल्याने त्याला कामावरून काढून टाकले. Anil Varshney असं या व्यक्तीचं नाव असून या प्रकरणी कोर्टात खटला सुरू आहे. missile defence contractor Parsons Corporation आणि US Defence Secretary Lloyd Austin विरूद्ध खटला भरण्यात आला आहे. यामध्ये कंपनीने systemic discriminatory actions घेतल्याचा इंजिनियरचा दावा आहे.
Anil Varshney च्या अमेरिकन सहकर्मचार्याने त्याला फोनवर बोलताना ऐकलं. Anil Varshney यांचे नातेवाईक 26 सप्टेंबर 2022 दिवशी निधन पावले. त्यांच्याशी मृत्यूपूर्वी झालेल्या 2 मिनिटांच्या कॉलवरून हा प्रकार घडला आहे.नक्की वाचा: United Kingdom News: कामावर मोबाईल वापरला म्हणून महिलेला नोकरीवरून हटवलं .
खटल्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, सहकार्याने खोटी माहिती दिल्याचं सांगण्यात आले आहे. कोणतीही गोपनीय माहिती फोन वर दिली असल्याचा दावा फेटाळण्यात आला आहे. तसेच फोन चालू असतानाही कोणत्याही गोपनीय माहितीचा उल्लेख केला असल्याचं त्यांनी फेटाळलं आहे. त्यांच्यामध्ये फोन हा ते क्युबिकल मध्ये असताना झाला. तेव्हा ना कोणता फोन सुरू होता ना तशी कोणतीही माहिती भिंतींवर लटकत होती. त्यामुळे गोपनीय माहिती पसरण्याची कोणतीच सूतराम शक्यता नाही.
Anil Varshney यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनियरिंग मध्ये पदवी प्राप्त केली आहे आणि ते 1968 मध्ये यूएसमध्ये स्थलांतरित झाले आहेत. त्यांनी जुलै 2011 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत Parsons' Huntsville कार्यालयात काम केले आणि त्यांना सिस्टम इंजिनीअरिंगमध्ये "Contractor of the Year"म्हणून ओळखले गेले. MDA शिफारशीचे पत्र देखील त्यांना देण्यात आले आहे.
AL.com नुसार, Anil Varshney यांनी या खटल्याद्वारा त्यांच्या पूर्वीच्या कामाच्या ठिकाणी त्यांना पुन्हा रूजू करण्यात यावं असं म्हटलं आहे.