भारत अमेरिकेला खूश करण्यासाठी व्यापारी करार करु इच्छितो: डोनाल्ड ट्रम्प

निशाणा साधताना ट्रम्प यांनी 'टेरिफ किंग' (उत्पादनशुल्क वाढीचा राजा) अशी उपाधी दिली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Photo Credits: Getty/File)

अमेरिकेला खूश करण्यासाठीच भारत व्यापारी करार करु इच्छितो, असा सनसणीत टोला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लगावला आहे. अमेरिकन उत्पादनांवर लावण्यात आलेल्या शूल्कावरून ट्रम्प यांनी भारतावर सोमवारी निशाणा साधला. ट्रम्प यांनी यापूर्वीही अमेरिकन उत्पादनांवर लावण्यात येणाऱ्या उत्पादन शुल्कावरुन भारतावर निशाणा साधला आहे. असा निशाणा साधण्याची ही त्यांची दुसरी वेळ आहे.

निशाणा साधताना ट्रम्प यांनी 'टेरिफ किंग' (उत्पादनशुल्क वाढीचा राजा) अशी उपाधी दिली. दरम्यान, ट्रम्प यांनी भारताला टोला लगावतानाच आम्हीही भारतीय उत्पादनांवर इतकाच कर लावू असा इशाराही दिला. तेव्हा, भारताने अमेरिकेसोबत व्यापारी करार करण्याची इच्छा व्यक्त केल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले.

दरम्यान, ट्रम्प यांनी भारत अमेरिकेसोबत व्यापारी करार करण्याच इच्छुक असल्याचा पुनरुच्चार शनीवारीही केला होता. तर, व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही ट्रम्प यांच्या वृत्ताला प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे दुजोरा दिला. मात्र, याबाबत अताच काही भाष्य करणे घाईचे ठरेल असेही तो म्हणाला.



संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

Australia Bans Social Media for Kids Under 16: आता ऑस्ट्रेलियात 16 वर्षांखालील मुले सोशल मीडिया वापरू शकणार नाहीत; बंदी घालणारे विधेयक संसदेत मंजूर, ठरला असा पहिला देश

Bangladesh ISKCON News: बांग्लादेशमध्ये इस्कॉनला मोठा दिलासा; उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नका

Fake Pregnancy Scam Exposed in Nigeria: नायजेरियात समोर आला बनावट गर्भधारणा घोटाळा; सुमारे 15 महिने गर्भवती राहिल्याचा महिलेचा दावा, जाणून घ्या काय आहे प्रकरण

3.5 Days a Week Work: आठवड्यात फक्त 3.5 दिवस काम, 100 वर्षांचे आयुष्य; जेपी मॉर्गनचे सीईओ Jamie Dimon यांनी वर्तवले कर्मचाऱ्यांचे भविष्य