ILO Report 2019: सावधान! तुमची नोकरी धोक्यात आहे; 2030 पर्यंत संपणार 34 दशलक्ष जॉब
जलवायु परिवर्तन आणि वातावरणात होणारा बदल हे नोकऱ्या संपुष्टात येण्याचे प्रमुख कारण असेन. तापमान बदलामुळे उत्पन्न आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे लोक काम करण्यास अकार्यक्षम ठरतील. या अहवालात असेही म्हटले आहे की, या बदलाचा सर्वाधिक परिणाम हा विकसनशील देशांवर होईल. तसेच, या बदलामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे 2.4 ट्रिलियन डॉलर इतके नुकसान होईल.
International Labour Organisation (ILO) Report 2019: नोकरी करत असलेल्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्या सर्वांसाठीच एक धक्कादायक बातमी आहे. येत्या 2030 या वर्षापर्यंत सुमारे 34 दशलक्ष लोकंच्या नोकऱ्या संपुष्टात येण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्र (United Nations) संचलित संस्था आंतरराष्ट्रीय श्रम संघटन (International Labor Organization) अहवालात हे धक्कादायक भाकित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय श्रम संघटन अर्थातच ILO ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, जलवायु परिवर्तन आणि वातावरणात होणारा बदल हे नोकऱ्या संपुष्टात येण्याचे प्रमुख कारण असेन. तापमान बदलामुळे उत्पन्न आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे लोक काम करण्यास अकार्यक्षम ठरतील. या अहवालात असेही म्हटले आहे की, या बदलाचा सर्वाधिक परिणाम हा विकसनशील देशांवर होईल. तसेच, या बदलामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे 2.4 ट्रिलियन डॉलर इतके नुकसान होईल.
वाढत्या लोकसंख्येचा भारतावर परिणाम
आयएलओच्या अहवालानुसार, प्रचंड प्रमाणात वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे भारतावर याचा प्रचंड मोठा परिणाम होऊ शकतो. भारतात काम करण्याच्या तासांमध्ये 5.8 टक्क्यांची कमतरता भासेन. जे प्रमाण 3.4 कोटी नोकऱ्यांच्या बोरोबरीत असेन. 1995 मध्ये तापमान वाढीमुळे जागतिक पातळीवर तब्बल 280 अब्ज डॉलरचे नुकसान झाले होते. परंतू, 2030 मध्ये हा आकडा 2.4 ट्रिलियन डॉलरवर पोहोचेन. यात अविकसित आणि विकसनशील देशांचे प्रमाण मोठे असेन.
कामाच्या तासांमध्ये घट
याशिवाय वाढत्या तापमानामुळे चीन देशातील सरासरी कामाच्या तासांमध्ये 078 टक्क्यांची कमतरता येईल. ज्यामुळे 50 लाख लोकांच्या नोकऱ्या जातील. अमेरिकेत हेच प्रमाण 0.21 टक्के राहील ज्यामुळे 30 लाख नोकऱ्यांवर गदा येईल. काही अशियाई आणि अफ्रीकी देशांनाही काम करण्याच्या तासांमध्ये घट होण्याचे प्रमाण 0.21 इतके होण्याची शक्यता आहे. चाड (Chad) नावाच्या देशातही हे प्रमाण 7.11 टक्के इतके असेन. तर, सुदान मध्ये 5.9, कंबोडिया मध्ये 7.83 आणि थायलंडमध्ये हेच प्रमाण 6.39 इतके असू शकते. (हेही वाचा, Effects Of Demonetisation: नोटबंदी निर्णयाच्या तडाख्यात 50 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या - अहवाल)
ग्रामिण भागातून शहराकडे स्थलांतर
काम करण्याचे तास कमी झाल्यामुळे अधिक चांगले काम मिळविण्यासाठी लोक नोकरीच्या शोधात घराबाहेर पडतील. खास करुन ग्रामिण भागातून शहराकडे स्थलांतर होण्याचे प्रमाण प्रचंड वाढेल. ILO च्या अहवालानुसार 2005 ते 2015 या कालावधीत तापमानाचा स्थर वाढल्याने आऊट -मायग्रेशनमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)