Hong Kong कडून एअर इंडिया, विस्तारा फ्लाइट्सच्या उड्डाणावर येत्या 30 ऑक्टोंबर पर्यंत बंदी, प्रवासी COVID19 पॉझिटिव्ह आल्याने घेतला निर्णय

कारण या विमानातून प्रवास करणाऱ्या काही प्रवाश्यांना कोरोनाची लागण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Air India | Representational Image | (Photo Credits: Wikimedia Commons)

हाँगकाँने (Hong Kong)  एअर इंडिया  (Air India) आणि विस्तारा फ्लाइट्सच्या (Vistara Flights)  उड्डाणांवर येत्या 30 ऑक्टोंबर पर्यंत बंदी घातली आहे. कारण या विमानातून प्रवास करणाऱ्या काही प्रवाश्यांना कोरोनाची लागण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. हाँगकॉंग मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. ही तिसरी वेळ आहे की हाँगकाँग सरकारने कोरोना व्हायरसचे संक्रमण झालेले रुग्ण आढळल्याने ही बंदी घातली आहे. यापूर्वी 20 सप्टेंबर ते 3 ऑक्टोंबर आणि 18 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली होती. कोरोना व्हायरसच्या काळात हाँगकाँगने प्रथमच विस्ताराच्या उड्डाणावर बंदी घातली आहे.(Coronavirus in New Zealand: न्यूझीलंडने दुसऱ्यांदा केली कोरोना विषाणूवर मात; पंतप्रधान Jacinda Ardern ने हटवले लॉक डाऊनने निर्बंध)

दिल्ली-हाँगकाँग आणि चेन्नई-हाँगकाँग असा विमानातून प्रवास करणाऱ्या काही जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळेच एअर इंडिया आणि विस्तारा फ्लाइट्स 17 ते 30 ऑक्टोंबर पर्यंतची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.(Coronavirus: कोरोना व्हायरस महामारीमुळे 2021 पर्यंत 15 कोटी लोकांवर ओढावेल अत्यंत गरिबीची परिस्थिती- World Bank)

तर भारता व्यतिरिक्त बांगलादेश, इंडोनेशिया, कझाकिस्तान, नेपाळ, पाकिस्तान, फिलिपिन्स, साउथ अफ्रिका आणि युएस येथून हाँगकाँग मध्ये येणाऱ्या सर्व प्रवाशांना कोरोनाची चाचणी निगेटिव्ह असल्याचे सर्टिफिकेट दाखवणे अनिवार्य असल्याचे तेथील सरकारने स्पष्ट केले आहे. तर या नऊ देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांनी विमानतळावर उतरल्यानंतर कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्याचे प्रमाणपत्र दाखवणे अनिवार्य आहे. हा नियम हाँगकाँग सरकारकडून जुलै महिन्यातच लागू करण्यात आला आहे.

दरम्यान  भारतात कोरोनाच्या महासंकटामुळे 23 मार्च पर्यंत आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे रद्द केली गेली होती. मात्र आता वंदे भारत मिशन अंतर्गत परदेशात अडकलेल्या नागरिकांना आपल्या मायदेशी आणले जात आहे.तर आता पर्यंत हजारोंच्या संख्येने परदेशात विविध कारणासाठी गेलेल्या लोकांना भारतात आणण्यात आले आहे.