Joe Biden यांनी रचला इतिहास; पहिल्यांदाच अमेरिकन प्रशासनात 20 भारतीय-अमेरिकन लोकांना स्थान

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बिडेन (Joe Biden) यांनी इतिहास रचला आहे. 20 जानेवारी रोजी शपथ घेणाऱ्या बिडेन यांनी 13 महिलांसह किमान 20 भारतीय-अमेरिकन लोकांना त्यांच्या कारभारातील प्रमुख पदांवर उमेदवारी दिली आहे

Joe Biden and Kamala Harris. (Photo Credits: Twitter|@JoeBiden)

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बिडेन (Joe Biden) यांनी इतिहास रचला आहे. 20 जानेवारी रोजी शपथ घेणाऱ्या बिडेन यांनी 13 महिलांसह किमान 20 भारतीय-अमेरिकन लोकांना त्यांच्या कारभारातील प्रमुख पदांवर उमेदवारी दिली आहे. या 20 भारतीय-अमेरिकन लोकांपैकी कमीतकमी 17 लोक व्हाइट हाऊसमध्ये मोठी पदे भूषवतील. अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपैकी एक टक्का भारतीय-अमेरिकन आहे आणि कोणत्याही प्रशासनात पहिल्यांदाच इतक्या छोट्या समुदायामधून इतक्या मोठ्या संख्येने लोक नियुक्त होतील.

बिडेन 20 जानेवारी रोजी अमेरिकेच्या 46 व्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतील आणि कमला हॅरिस देशाच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतील. हॅरिस अमेरिकेतील भारतीय वंशाच्या पहिल्या उपाध्यक्ष असतील. ही जबाबदारी स्वीकारणाऱ्या त्या पहिल्या आफ्रिकन-अमेरिकनही आहेत. बिलेन प्रशासनात व्हाईट हाऊसच्या कार्यालयासाठी व्यवस्थापन आणि अर्थसंकल्प संचालक म्हणून नीरा टंडन यांना तर, अमेरिकेचे सर्जन जनरल म्हणून डॉ. विवेक मूर्ती यांना नामनिर्देशित करण्यात आले आहे.

वनिता गुप्ता यांना कायदा मंत्रालयाचे असोसिएट अटॉर्नी जनरल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. बिडेन यांनी शनिवारी नागरी संरक्षण, लोकशाही आणि मानवी हक्कांसाठी राज्याचे परराष्ट्र सेवेतील अधिकारी उजरा जीया यांची नेमणूक केली.

दुसरीकडे, या दोघांच्या स्वागतासाठी तमिळनाडूच्या पारंपारिक कोलम (Kolam) रांगोळीला जागा मिळाली आहे. शपथविधीशी संबंधित ऑनलाइन सोहळ्यामध्ये ही रांगोळी मुख्य आकर्षण असेल. तामिळनाडूच्या पारंपारिक रांगोळीला 'कोलम' म्हणतात. कोलम घराबाहेर, अंगणात काढणे शुभ असते असे म्हणतात. हॅरिस यांची आई मूळची तामिळनाडूची होती, म्हणून या रांगोळीला स्थान मिळाल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक सुरक्षा संस्थांच्या मंजुरीनंतर याच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित केली जाईल.

रांगोळीच्या डिझाइनसाठी ‘Inauguration Kolam 2021' नावाची ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आली होती. या संस्थेच्या सदस्या सौम्या सोमनाथ यांनी सांगितले की, यामध्ये अमेरिका आणि भारतातील सुमारे 1800 लोकांनी रांगोळीचे डिझाईन्स पाठविले. यातील एक रांगोळी डिझाइन निश्चित करण्यात आली. पूर्वी ही रांगोळी व्हाइट हाऊसच्या बाहेर काढली जाणार होती, पण नंतर ती कॅपिटल हिलच्या बाहेर काढण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, आता ती केवळ व्हिडिओद्वारे दर्शविली जाईल.

या उपक्रमात सहभागी झालेली मल्टीमीडिया कलाकार शांती चंद्रशेखर म्हणाल्या की, 'बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की, कोलम ही सकारात्मक उर्जा आणि नवीन सुरुवात यांचे प्रतीक आहे. आपापल्या घरांमधून पर्यावरणास अनुकूल सामग्रीद्वारे बनवलेल्या रांगोळी तयार करण्यासाठी, या उपक्रमात विविध समाजातील सर्व वयोगटातील लोकांनी भाग घेतला. स्थानिक पातळीवर सुरू केलेला हा उपक्रम आमच्या अपेक्षेपेक्षा मोठा झाला.' (हेही वाचा: Joe Biden आणि Kamala Harris Inauguration Ceremony मध्ये पाहायला मिळणार Kolam या भारतीय पारंपारिक कलेचा अविष्कार)

सुरक्षा व्यवस्थेमुळे वॉशिंग्टन डीसीमध्ये ही रांगोळी काढण्याची परवानगी मागे घेण्यात आली, म्हणूनच बिडेन आणि हॅरिसच्या स्वागतावेळी अमेरिकेचा बहु-सांस्कृतिक वारसा दर्शवण्यासाठी एका व्हिडिओमध्ये रांगोळीच्या हजारो डिझाईन्स सजवल्या जातील. दरम्यान, केरळ आणि तामिळनाडूमध्ये रांगोळीला कोलम म्हटले जाते. तांदळाच्या पीठाने ही रांगोळी काढतात. बंगालमध्ये याला अल्पना म्हणतात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now