स्पॅनिश चित्रकार Bartolomé Esteban Murillo यांच्या 400 व्या जन्मदिनी Google Doodle ची खास आदरांजली
हे मूळ चित्र वॉशिंगटनच्या आर्ट गॅलेरीमध्ये लावण्यात आले आहे.
Bartolomé Esteban Murillo Google Doodle: गूगल डुडलवर आज स्पॅनिश चित्रकार बार्तालोम एस्टेबान मुरिलो (Bartolomé Esteban Murillo)यांच्या 400 व्या जन्मदिनानिमित्त त्यांनीच रेखाटलेल्या प्रसिद्ध चित्राच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली आहे. धार्मिक आणि सामाजिक , ऐतिहासिक चित्र ही बार्तालोम (Bartolomé Esteban Murillo) यांची खासियत होती. 1655-1660 च्या काळात त्यांनी काढलेले Two Women at a Window हे चित्र आज गुगल डुडलवर झळकत आहे. हे मूळ चित्र वॉशिंगटनच्या आर्ट गॅलेरीमध्ये लावण्यात आले आहे.
बार्तालोम एस्टेबान मुरिलो (Bartolomé Esteban Murillo)यांचा जन्म 1617 साली स्पेनच्या सविले शहरामध्ये झाला. कुटुंबातील जवळच्या व्यक्तींकडूनच त्यांनी चित्रकलेचे शिक्षण घेतले. त्यातील बारकावे समजून घेतले. Soult Immaculate Conception आणि Vision of Saint Anthony ही त्यांची जगप्रसिद्ध चित्र आहेत. प्रामुख्याने सेंट पीटर्सबर्ग येथील संग्रहालयात त्यांची चित्र ठेवण्यात आली आहेत.
सामान्य घरात जन्मलेल्या बार्तालोम एस्टेबान मुरिलो यांचं 1640 साली समृद्ध परिवारात लग्न झाले. 3 एप्रिल 1682 दिवशी बार्तालोम एस्टेबान मुरिलो यांचं निधन झाले. त्यावेळेस त्या 64 वर्षांच्या होत्या.