Rishi Sunak यांची UK च्या आगामी पंतप्रधान निवडीच्या शर्यतीमध्ये आघाडी कायम
Rishi Sunak हे भारतीय उद्योगपती नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचे जावई आहेत.
Boris Johnson हे युके च्या पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्यानंतर आता नव्या पंतप्रधानांच्या निवडीची लगबग सुरू झाली आहे. या शर्यतीमध्ये भारतीय वंशाचे Rishi Sunak आघाडी वर आहे. Tom Tugendhatहे तिसर्या फेरीनंतर बाद झाले आहेत. आता या पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये केवळ 4 उमेदवार उरले आहेत.
Rishi Sunak हे माजी अर्थमंत्री आहे. त्यांना तिसर्या फेरीमध्ये 115 मतं मिळाली आहेत. त्यांच्या खालोखाल ट्रेड मिनिस्टर Penny Mordaunt यांना 82 मतं आहेत. त्यानंतर फॉरेन सेक्रेटरी Liz Truss यांना 71 आणि Kemi Badenoch यांना 58 मतं मिळाली आहेत. शर्यतीमध्ये केवळ 2 उमेदवार राहत नाहीत तो पर्यंत म्हणजेच गुरूवार पर्यंत या फेर्या सुरू ठेवल्या जाणार आहेत. त्यानंतर 160,000 पात्र मतदारांमधून पंतप्रधानांची निवड केली जाईल. Rishi Sunak : इन्फोसीसचे जावई होणार ब्रिटनचे नवे पंतप्रधान? जाणून घ्या ऋषि सुनक यांचं भारतीय कनेक्शन.
पहा ट्वीट
ब्रिटनमधील सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाला पाठिंबा देणार्या जवळपास निम्म्या मतदारांचा असा विश्वास आहे की ऋषी सुनक चांगले पंतप्रधान बनतील. ओपिनियन पोलमध्ये ऋषी सुनक हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पक्षाला पाठिंबा देणाऱ्यांपैकी 48 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक असलेले सुनक एक चांगला पंतप्रधान बनतील. 'द संडे टेलिग्राफ'च्या वृत्तानुसार, जेएल पार्टनर्सने केलेल्या जनमत सर्वेक्षणात 4,400 हून अधिक लोकांचा समावेश होता.