Female Teacher Raped Student: शिक्षिकेने केला 16 वर्षांच्या विद्यार्थ्यावर बलात्कार; दाखवले चांगल्या मार्कांचे आमिष

त्यानंतर याबाबत पोलिसात तक्रार दाखल करून, चौकशी सुरु झाली. तपासात पूर्ण सहकार्य करू असेही शाळा प्रशासनाने सांगितले.

Photo Credit: File Image

शिक्षक (Teacher) आणि विद्यार्थी (Students) यांचे नाते खूप खास असते. एका मातीच्या गोळ्याला आकार देऊन शिक्षक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतात विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी जीवाचे रान करणारे अनेक शिक्षक तुम्ही पाहिले असतील, परंतु एका अमेरिकन शिक्षिकेने (US Teacher) तिच्या विद्यार्थ्यासोबत जे केले ते ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. आपली लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी या शिक्षिकेने 16 वर्षीय विद्यार्थ्यावर बलात्कार (Rape) केला आहे. यासाठी तिने विद्यार्थ्याला चांगले मार्क्स देण्याचे आमिष दाखवले होते.

मिसूरीमधील 26 वर्षीय शिक्षिका लीना स्टीवर्टला तिच्या एका विद्यार्थ्यावर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तिने विद्यार्थ्याला आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्यास तो चांगल्या मार्कांनी पास होईल, असे आमिष दाखविल्याचा आरोप आहे. विद्यार्थ्याने दावा केला की, जर आपण शिक्षिकेचे ऐकले नाही तर ती आपल्याला नापास करेल अशी भीती त्याला वाटत होती म्हणून त्याने तिची मागणी मान्य केली.

हे प्रकरण ऑक्टोबरमधील आहे, जेव्हा विद्यार्थ्याचे वय अवघे 16 वर्षे होते. तेथील कायद्यानुसार तो त्यावेळी अल्पवयीन होता. चौकशीमधील विद्यार्थ्याने सांगितले की, लीना त्याची विशेष काळजी घेत होती. अभ्यासादरम्यान ती त्याला खूप मदत करायची. दोघांची पहिली भेट एका दुसऱ्या विद्यार्थ्याच्या घरी झाली होती. यानंतर लीनाने त्याच्याशी दोनदा शारीरिक संबंध ठेवले. दोन्ही वेळा शिक्षिका तिच्या गाडीत येऊन या विद्यार्थ्याला सोबत घेऊन गेली होती.

पहिल्या भेटीत लीनाने विद्यार्थ्याचे चुंबन घेऊन त्याला कपडे उतरवण्यास सांगितले. हे ऐकून विद्यार्थी अवाक झाला. त्याने लीनाला अनेकवेळा त्याला घरी पाठवण्याची विनवणी केली, परतू लीनाने ऐकले नाही. लीनाने त्याला चांगल्या मार्कांचे आमिष दाखवून त्याच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. दुसऱ्या भेटीतही असेच झाले. ही बाब शाळा प्रशासनाला कळताच त्यांनी लीनाला रजेवर पाठवले. (हेही वाचा: दिल्लीमध्ये 12 वर्षाच्या मुलावर 4 जणांचा सामुहिक बलात्कार; प्रायव्हेट पार्टमध्ये घुसवला रॉड, केली बेदम मारहाण)

अनुचित वर्तनाचा कोणताही आरोप आम्ही गांभीर्याने घेतो, असे प्रशासनाने म्हटले आहे. त्यानंतर याबाबत पोलिसात तक्रार दाखल करून, चौकशी सुरु झाली. तपासात पूर्ण सहकार्य करू असेही शाळा प्रशासनाने सांगितले. दरम्यान, याआधी अमेरिका, कॅनडा आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये महिला शिक्षकांनी अल्पवयीन विद्यार्थ्यांशी शारीरिक संबंध ठेवल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.