Electricity From Air: काय सांगता? आता हवेपासून होणार विजेची निर्मिती; शास्त्रज्ञांनी लावला नवा शोध, घ्या जाणून

संशोधकांचे म्हणणे आहे की जर हे एंझाइम पुरेशा प्रमाणात बनवता आले तर सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे पवन-उर्जेवर चालवता येतील.

Representative image

भविष्यातील ऊर्जेचे संकट टाळण्यासाठी जगभरातील अनेक देश ऊर्जेचे नवीन स्रोत आणि पर्याय तपासून पाहत आहेत. रशिया-युक्रेन युद्धात जगातील अनेक देशांना ऊर्जा संकटाचा सामना करावा लागला होता. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून जगभरातील शास्त्रज्ञ ऊर्जेचे नवीन स्रोत शोधण्यात गुंतले आहेत. या पार्श्वभुमीवर आता शास्त्रज्ञांनी वीजपुरवठा करण्याचा नवा मार्ग शोधून काढला आहे व तो यशस्वी झाला तर जगात कुठेही विजेची कमतरता भासणार नाही. शास्त्रज्ञ वाऱ्यापासून वीज (Electricity From Air) बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. होय, हे जरी विचित्र वाटत असले तरी शास्त्रज्ञांनी हवेत असलेल्या हायड्रोजनपासून वीज निर्माण करू शकणारे एन्झाइम शोधून काढले आहे.

या एन्झाइममध्ये वीज निर्माण करण्याची अफाट क्षमता आहे. यावर शास्त्रज्ञांचा विश्वास असून वाऱ्यापासून निर्माण होणारी ऊर्जा पूर्णपणे स्वच्छ असेल आणि इतर कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत, असा दावा त्यांनी केला आहे. संशोधकांनी या एन्झाइमला Huc असे नाव दिले आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, Huc पृथ्वीच्या आत असलेल्या ऊर्जेचा वापर करण्यास मदत करते. त्याच्या मदतीने वाऱ्याच्या शक्तीचेही विजेमध्ये रूपांतर करता येते. त्याच्या मदतीने 'हवेवर चालणारी' उपकरणे बनवता येतील, अशी आशा शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या मोनाश विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हा शोध लावला आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की जर हे एंझाइम पुरेशा प्रमाणात बनवता आले तर सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे पवन-उर्जेवर चालवता येतील. एंजाइम हे सजीवांपासून तयार होणारा पदार्थ आहेत, जे  काही रासायनिक अभिक्रियांना गती देण्याचे काम करतात. पूर्वीच्या संशोधनात असे दिसून आले आहे की, काही प्रकारचे जीवाणू हवेतील हायड्रोजनचे उर्जेमध्ये रूपांतर करण्यास सक्षम असतात ज्यामुळे त्यांना पोषक नसलेल्या वातावरणातही टिकून राहण्यास मदत होते. संशोधक डॉ. ख्रिस ग्रीनिंग यांच्या मते, वीज निर्मितीसाठी हा एक मोठा आधार आहे. (हेही वाचा: Salt Advisory By UN: चिमूटभर मीठ कमी खाल्लाने वाचू शकतो तुमचा जीव; WHO जारी केला खास रिपोर्ट)

नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात मेलबर्नच्या एका संशोधकानेही एन्झाईम्सच्या वापराबाबत नमूद केले आहे. त्यांनी यासाठी क्रायोजेनिक इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी नावाचे तंत्र वापरले आहे. Huc हा हायड्रोजनचे विद्युत उर्जेमध्ये रूपांतर करतो असाही त्यांचा विश्वास होता. क्रायोजेनिक इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीमुळे शास्त्रज्ञांना ही प्रक्रिया समजण्यास मदत झाली.