Turkiye Earthquake: तुर्कीमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; सुदैवाने 5.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भुंकपाने कोणतेही जीवीहानी नाही

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपामुळे मृतांची संख्या 45 हजारांच्या पुढे गेली आहे. बचावकार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढत आहे.

Earthquake (PC- Pixabay)

Turkiye Earthquake: तुर्की (Turkiye) मध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले आहेत. मध्य तुर्की भागात शनिवारी 5.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. युरोपीयन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्र (EMSC) नुसार भूकंप 10 किमी (6.21 मैल) खोलीवर होता. मात्र, भूकंपानंतर जीवित वा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही.

45000 हून अधिक लोकांचा मृत्यू -

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपामुळे मृतांची संख्या 45 हजारांच्या पुढे गेली आहे. बचावकार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढत आहे. भूकंपामुळे तुर्कीमधील सुमारे 2,64,000 अपार्टमेंट उद्ध्वस्त झाले आहेत. (हेही वाचा - Turkiye Earthquake: तुर्कीमध्ये भूकंपाच्या 260 तासांनंतर वाचला 14 वर्षांच्या उस्मानचा जीव! तुर्कीच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली माहिती)

यामध्ये राहणाऱ्या लाखो लोकांपैकी बरेच लोक मारले गेले आहेत किंवा जखमी झाले आहेत. लाखो लोकांचे प्राण वाचले पण त्यांचे सर्व काही संपले आहे आणि कडाक्याच्या थंडीत ते मूलभूत सुविधांविना दिवस काढत आहेत.

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये दोन दशलक्षाहून अधिक बेघर लोक तात्पुरत्या आश्रयस्थानांमध्ये राहत आहेत. तुर्कस्तानच्या भूकंपग्रस्त भागात बचावकार्य सुरू झाले असून आता मदत साहित्य पोहोचू लागले आहे, मात्र सीरियातील परिस्थिती भयावह आहे. भूकंपामुळे तिथल्या उत्तर-पश्चिम भागात प्रचंड विध्वंस झाला आहे. हा भाग बंडखोरांच्या ताब्यात आहे आणि ते प्रभावित भागात मदत पुरवठा पोहोचू देत नाहीत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement