डॉमिनोज पिझ्झा आणि कोका कोला कंपनीचा करार रद्द; या नवीन सॉफ्टड्रिंकची लागली वर्णी

पिझ्झा बनवणारी कंपनी डॉमिनोज आणि सॉफ्टड्रिंक बनवणारी कंपनी कोका कोला या दोघांमधील तब्बल 20 वर्षे जुनी पार्टनरशीप संपुष्टात आली आहे

डॉमिनोज (Photo credit : Firstpost Hindi)

जगातील सर्वात लोकप्रिय असलेल्या फूड चेन पैकी एक म्हणजे डॉमिनोज (Domino's). आपला पिझ्झा आणि कोका कोला यांच्या जोरावर अतिशय कमी वेळात डॉमिनोजने मैलाचा दगड गाठला. आजही डॉमिनोज पिझ्झासोबत कोक हे समीकरण ग्राहकांच्या डोक्यात इतके फिट्ट बसले आहे की, या दोन गोष्टींशिवाय इतर कोणत्याही पदार्थाची गरज भासत नाही. मात्र ही पिझ्झा बनवणारी कंपनी डॉमिनोज आणि सॉफ्टड्रिंक बनवणारी कंपनी कोका कोला या दोघांमधील तब्बल 20 वर्षे जुनी पार्टनरशीप संपुष्टात आली असून, तुम्हाला यापुढे डॉमिनोजच्या कोणत्याही आउटलेटमध्ये कोका कोलाचे कोणतेही उत्पादन मिळणार नाहीत.

डॉमिनोज चालवणाऱ्या जुबलियंट या कंपनीने कोकशी असणारा करार रद्द करून, पेप्सिकोशी नवा करार केला आहे. कंपनीने हा निर्णय खर्च कमी करण्यासाठी घेतला असल्याचे सांगितले जाते. या निर्णयामुळे कोका कोलाला फार मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. कारण डॉमिनोजमुळे बाजारात आपले पाय रोवण्यासाठी कोका कोलाला फारच मदत झाली होती. मात्र आता कोकच्या विक्रीवर या निर्णयाचा फार मोठा परिणाम होणार आहे.

सध्या जगभरातील 85 देशांमध्ये डॉमिनोज आपली सेवा पुरवत आहे. मिशिगन याठिकाणी कंपनीचे हेडक्वार्टर असून, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड आणि मलेशिया हे देश सोडून संपूर्ण जगभरात कोकाकोला आणि डॉमिनोजची पार्टनरशिप होती. मात्र आता हे नाते तुटल्याने फक्त मॅकडोनल्डसोबतच कोकचा करार अबाधित आहे. तर पिझ्झा हट, केएफसी, टाको बेल आणि आता डॉमिनोज यांसारख्या ब्रँडशी पेप्सिको जोडले गेले आहे.



संबंधित बातम्या

सावधान! पिझ्झामध्ये आढळले Cockroach , झुरळांचा प्रादुर्भाव आढळून आल्यानंतर Domino's Pizza Outlet ला ठोकले टाळे

Dominos मधून अन्नपदार्थ मागवणे ठरले धोक्याचे; कोट्यावधी ग्राहकांना बसला मोठा फटका, जाणून घ्या सविस्तर

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

Ping Chayada Dies: थाई मसाजनंतर पॉप गायक पिंग चायदाचा मृत्यू, जाणून घ्या काय झालं?

Indian Student Shot Dead in Canada: धक्कादायक! सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या 20 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची कॅनडात गोळ्या झाडून हत्या

Kabir Kabeezy Singh Passes Away: अमेरिकेच्या गॉट टॅलेंट कॉमेडियन कबीर कबीझी सिंग यांचे निधन; 39 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Bashar Al-Assad Flees Damascus: दमास्कस बंडखोरांच्या ताब्यात, सीरियाचे अध्यक्ष डॉ. बशर अल-अस्साद पळाले- रिपोर्ट