चीनमध्ये कोरोनाचे 1523 बळी: परदेशातून देशात परतणाऱ्या चिनी नागरिकांसाठी नवा नियम लागू; अंमलबजावणी न केल्यास होणार शिक्षा
तसेच 66 हजार 492 चीनी नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना व्हायरस हा संसर्गजन्स आजार असल्याने चीन सरकारने नववर्षांच्या सुट्ट्यांमध्ये वाढ केली होती. त्यामुळे अनेक चीनी नागरिक पदेशात गेले होते. मात्र, आता हे नागरिक आपली सुट्टी संपवून मायदेशी परतत आहेत. परंतु, चीनमध्ये परतणाऱ्या नागरिकांसाठी चीन सरकारने शुक्रवारी नवा नियम लागू केला आहे. या नियमांचे पालन करणे सर्वांसाठी बंधनकारक आहे.
चीनमध्ये कोरोना व्हायरसची (Corona virus) लागण झाल्याने आतापर्यंत 1 हजार 523 बळी गेले आहेत. तसेच 66 हजार 492 चीनी नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना व्हायरस हा संसर्गजन्स आजार असल्याने चीन सरकारने नववर्षांच्या सुट्ट्यांमध्ये वाढ केली होती. त्यामुळे अनेक चीनी नागरिक पदेशात गेले होते. मात्र, आता हे नागरिक आपली सुट्टी संपवून मायदेशी परतत आहेत. परंतु, चीनमध्ये परतणाऱ्या नागरिकांसाठी चीन सरकारने शुक्रवारी नवा नियम (New Rules) लागू केला आहे. या नियमांचे पालन करणे सर्वांसाठी बंधनकारक आहे.
तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की, असा कोणता नियम आहे. परदेशातून बीजिंगमध्ये परतणाऱ्या नागरिकांना 14 दिवस सर्वांपासून वेगळे ठेवण्यात येणार आहेत. या नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत कोरोनाची लागण झालेली आहे की नाही. तसेच या नागरिकांना कोरोनाची लक्षणं आढळत नाहीत हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्यांना 14 दिवस वेगळं राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या नियमाचे पालन न करणाऱ्याला शिक्षा देण्यात येणार आहे. चीन सरकारने शुक्रवारी रात्री या नियमाची घोषणा केली आहे. तसेच या नियमांच्या अंमलबजावणी संदर्भात सूचनाही दिल्या आहेत. (हेही वाचा - Coronavirus: कोरोना विषाणू पसरवल्याचा संशय असणारा स्टिव्ह वॉल्श अखेर सापडला)
याशिवाय चीनच्या बाहेर गेलेल्या या नागरिकांना आपण कुठे-कुठे प्रवास केला? यासंदर्भातही माहिती द्यावी लागणार आहे. हा नियम देशाबाहेर प्रवास करून आलेल्या किंवा बिंजींग शहराबाहेर गेलेल्या प्रत्येक नागरिकांसाठी बंधनकारक असणार आहे. चीनमध्ये शुक्रवारी 2 हजार 641 नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.