D614G: मलेशियामध्ये आढळला कोरोना विषाणूचा धोकादायक असा नवा स्ट्रेन; कोरोना पेक्षा 10 पट अधिक वेगाने पसरत आहे संसर्ग

या विषाणूमुळे आतापर्यंत जगात 7.73 लाख लोक मरण पावले आहेत. एकीकडे सर्वजण कोरोनाशी लढा देत असताना आता, कोरोनाच्या आणखी एका धोकादायक रूपाचा उदय झाला आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना विषाणू (Coronavirus) व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत जगात 7.73 लाख लोक मरण पावले आहेत. एकीकडे सर्वजण कोरोनाशी लढा देत असताना आता, कोरोनाच्या आणखी एका धोकादायक रूपाचा उदय झाला आहे. या विषाणूची नोंद मलेशियात (Malaysia) झाली आहे. D614G नावाचा हा विषाणू कोरोना विषाणूपेक्षा 10 पट अधिक वेगाने पसरत आहे. ही माहिती मलेशियाचे आरोग्य महानिदेशक नूर हिशम अब्दुल्ला (Noor Hisham Abdullah) यांनी फेसबुक पेजवर दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका रेस्टॉरंटचा मालक आणि कायमस्वरूपी रहिवासी जेव्हा भारतातून परत आले, तेव्हापासून सुरू झालेल्या क्लस्टरमधून तीन प्रकरणांमध्ये हे म्युटेशन दिसून आले आहे.

फिलिपाइन्सहून परत आलेल्या एका व्यक्तीकडून सुरू झालेल्या क्लस्टर प्रकरणातही हे सापडले आहे. अब्दुल्ला म्हणाले की, या कोरोना विषाणूच्या नवीन रूपाचा अर्थ असा आहे की म्यूटेशन विरूद्ध लसांवरील विद्यमान अभ्यास अपूर्ण किंवा कुचकामी असू शकतो. ते म्हणाले की सध्या तरी यांच्यावर नियंत्रण ठेवले गेले आहे. ही चाचणी ही एक प्रारंभिक चाचणी आहे आणि इतर अनेक प्रकरणांची चाचणी घेण्यासाठी अनेक पाठपुरावा चालू आहे.

पहा फेसबुक पोस्ट -

अब्दुल्ला म्हणाले की, याचा अर्थ असा आहे की लोकांना देशात अधिक जागरूक आणि सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. म्युटेशान इतर लोकांना 10 पट जास्त संक्रमित करते आणि एखादी व्यक्ती 'सुपर स्प्रेडर' च्या माध्यमातून अधिक सहजतेने तो पसरतो. मलेशियाचे मुख्य उद्दीष्ट सार्वजनिक आरोग्य सुरक्षित करणे हे आहे. तसेच, लोकांना कोविड-19 नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले गेले आहे. (हेही वाचा: Coronavirus: रशियाचे उपराष्ट्राध्यक्ष Yury Trutnev कोरोना व्हायरस संक्रमित)

अमेरिकेचे आरोग्य सल्लागार डॉ. फौसी यांनी म्हटले आहे की, या म्युटेशनमुळे कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने होऊ शकतो. कोरोना विषाणूचे हे म्युटेशन अमेरिका आणि युरोपमधील देशांमध्येही वेगाने पसरत आहे. त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, कोरोना व्हायरस म्युटेशनमुळे मानवांना अधिक गंभीर आजार होण्याचे पुरावे अद्याप मिळालेले नाहीत.