Omicron Virus: जगभरात 110 देशांमध्ये वाढतोय Coronavirus, ओमायक्रोन संक्रमितांची संख्याही वाढली, जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा

मात्र, संपली नाही. कोविड-19 (COVID19 Virus) ला ट्रॅक करण्याची आमची क्षमताही धोक्यात आहे. आणि जीनोमिक सिक्वेंस (Genome Sequencing) बाबतीत येणारे अहवालही कमी होत चालले आहे.

Coronavirus | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

जगभरामध्ये कोरोना व्हायरस महामारी (Coronavirus Pandemic) बऱ्याच अंशी कमी झाली आहे. ती पूर्णपणे संपली नाही. जागतिक आरोग्य संघटनेने दिलल्या इशाऱ्यानुसार आजही जगभरातील 110 देशांमधील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे डायरेक्टर जनरल टेड्रेस एधनॉम घेब्रिएसिस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी म्हटले की, कोरोना व्हायरस महामारी ही कमी आली आहे. मात्र, संपली नाही. कोविड-19 (COVID19 Virus) ला ट्रॅक करण्याची आमची क्षमताही धोक्यात आहे. आणि जीनोमिक सिक्वेंस (Genome Sequencing) बाबतीत येणारे अहवालही कमी होत चालले आहे. त्यामुळे ओमिक्रॉन (Omicron) संकटाचा सामना करणे आणि भविष्यातील व्हेरीएंटवर लक्ष्य ठेवणे कठीण होऊन बसणार आहे.

टेड्रेस एधनॉम घेब्रिएसिस यांनी पुढे बोलताना सांगितले की, COVID19 आता BA.4 आणि BA.5 च्या माध्यमातून विस्तारतो आहे. 110 देशांमध्ये कोरोना व्हायरस संसर्गामध्ये वाढ झाली आहे. एकूण जागतिक कोरोना महामारीत ही प्रकरणे 20% वाढली आहेत. दरम्यान, जागतिक पातळीवर मृत्यूदर स्थिर आहे. (हेही वाचा, WHO On Monkeypox: मंकीपॉक्स विषाणुचा वाढता संसर्ग गांभीर्य वाढवणारा, मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंतेचे कारण नाही- जागतिक आरोग्य संघटना)

COVID-19 आणि इतर आरोग्याच्या विषयांबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना घेब्रिएसिस यांनी म्हटले की, WHO ने सर्व देशांना अवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या लोकसंख्येचे सुमारे 70% लसीकरण करावे. त्यांनी पुढे म्हटले की, पाठिमागील 18 महिन्यांमध्ये जागतिक पातळीवर 12 बिलियन पेक्षा अधिक लस मोठ्या प्रमाणावर विस्तारीत झाली आहे. दरम्यान, दुसरा पैलू असा की कमकुवत अर्थव्यवस्था असलेले अनेक देश आजही कोरोना लसीकरणासाठी लसीच्या प्रतिक्षेत आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif