Coronavirus: कोरोना व्हायरसचे संक्रमण झालेल्या ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या प्रकृतीत सुधारणा-AFP
त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर कोरोनासंबंधित उपचार सुरु आहेत. तर बोरिस जॉन्सन यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती AFP न्यूज यांनी दिली आहे.
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून त्याच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. तरीही देशभरातील सर्व डॉक्टर्स आणि वैद्यकिय कर्मचारी कोरोनाशी लढा देण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांवर दिवसरात्र उपचार करत आहेत. तसेच सरकार सुद्धा विविध उपाययोजना करत आहेत. कोरोनाच्या विळख्यात बडे दिग्गज मंडळी सुद्धा अडकली आहेत. त्यापैकीच एक ब्रिटेनचे (British) पंतप्रधान बोरिस जॉन्सन (PM Boris Johnson) यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर कोरोनासंबंधित उपचार सुरु आहेत. तर बोरिस जॉन्सन यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती AFP न्यूज यांनी दिली आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ही बोरिस यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली होती.
बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी ट्वीट करत दिली होती. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले होते की, मला कोरोनाची हलकी लक्षणे जाणवत होती. मात्र कोरोनची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यानंतर बोरिस यांनी स्वत:लाच घरात प्रथम क्वारंटाइन करुन घेतले होते. परंतु प्रकृती अधिक बिघडू लागल्याने त्यांना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. परंतु सध्या बोरिस यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत आहे.(Coronavirus: 'आपण योद्धा आहात, लवकरच बरे व्हाल' नरेंद्र मोदी यांनी दिला ब्रिटेनच्या पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना धीर)
दरम्यान, ब्रिटनमध्ये आतापर्यंत 12 हजार पेक्षा अधिक लोकांना करोनाची लागण झाली असून 5 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती गंभीर असल्याने ब्रिटनमध्ये संचारबंदी घोशषीत करण्यात आली आहे. याआधी ब्रिटिश राजघराण्याचे प्रिन्स चार्ल्स यांनी करोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली होती. शाही राजघराण्यातही करोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता पंतप्रधानांनाही करोनाची लागण झाल्याने गांभीर्य वाढले आहे.