Cisco Layoffs: मेटा आणि ट्विटरनंतर आता सिस्को कंपनीत कर्मचारी कपात; चार हजारांहून अधिक लोकांची जाणार नोकरी
ही संख्या नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येपेक्षा थोडी कमी असेल. या आठवड्यात पहिल्या तिमाही कमाईच्या अहवालात (Q1 2023), Cisco ने $13.6 अब्ज कमाई नोंदवली,
मेटा (Meta), अॅमेझॉन (Amazon) आणि ट्विटरनंतर (Twitter) आता मोठी टेक कंपनी सिस्कोनेही (Cisco) आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची घोषणा केली आहे. कंपनी 4,000 हून अधिक कर्मचार्यांना काढून टाकत आहे, जे तिच्या कर्मचार्यांपैकी सुमारे 5 टक्के आहे. याआधी मेटाने 11,000 आणि अॅमेझॉनने 10,000 कर्मचार्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे.
सिलिकॉन व्हॅली बिझनेस जर्नलमधील एका अहवालानुसार, सिस्कोमध्ये सध्या सुमारे 83,000 कर्मचारी आहेत, त्यापैकी कंपनी सुमारे 4,100 नोकऱ्या कमी करण्याच्या तयारीत आहे. राईट टू बिझनेस रिबॅलेंसिंग कायद्यांतर्गत ही कर्मचारी कपात केली जात आहे. आतापर्यंत कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चक रॉबिन्स यांनी कर्मचारी कापतीबाबत कोणतीही विशिष्ट माहिती दिलेली नाही.
जोपर्यंत आम्ही सक्षम होत नाही तोपर्यंत आम्ही जास्त विस्तार करण्यास इच्छुक नाही, असे कंपनीने सांगितले. सिस्कोचे मुख्य वित्तीय अधिकारी स्कॉट हेरेन यांनी ‘पुनर्संतुलन’ कायद्याचा भाग म्हणून ही कर्मचारी कपात होणार असल्याचे सांगितले. चक रॉबिन्स म्हणाले की, खर्च कमी करण्यासाठी कंपनीकडून कर्मचारी कपात केली जात नाही, तर आम्ही कंपनीचा समतोल साधत आहोत. ज्या क्षेत्रात अधिक गुंतवणूक करता येईल, त्याकडे आम्ही लक्ष देत आहोत. (हेही वाचा: 'नवीन कार, टीव्ही-फ्रिज खरेदी करणे थांबवा'; Amazon चे संस्थापक Jeff Bezos यांची मंदीच्या शक्यतेबद्दल चेतावणी)
कंपनीने नवीन क्षेत्रात केलेल्या गुंतवणुकीमुळे अनेकांना नोकऱ्या उपलब्ध होतील. ही संख्या नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येपेक्षा थोडी कमी असेल. या आठवड्यात पहिल्या तिमाही कमाईच्या अहवालात (Q1 2023), Cisco ने $13.6 अब्ज कमाई नोंदवली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 6 टक्क्यांनी जास्त आहे. दरम्यान, याआधी ट्वीटरमध्ये सर्वाधिक, जवळपास 50 टक्के कर्मचारी कपात झाली आहे. त्यानंतर मेटामधून सुमारे 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाईल.