Fishing Boat Capsizes: हिंद महासागरात उलटली चिनी मच्छिमारांची बोट, 39 जण बेपत्ता

"लुपेंग युआन्यु 028" असे या जहाजाचे नाव असून हे जहाज खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी बांधण्यात आले होते, असे वृत्त CCTV ने दिले आहे. समुद्रात मासेमारी करण्यासाठी समुद्रात उतरलेल्या या जहाजावर 39 लोक होते.

Fishing Boat Capsizes | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

हिंद महासागरात चिनी मच्छिमारांची (Chinese Fishing Vessel ) एक बोट उलटली (Vessel Capsize)आहे. बोटीवर असलेले 39 खलाशी बेपत्ता आहेत. ही घटना मध्य हिंद महासागरात मंगळवारी पहाटे 3 वाजता (बीजिंग वेळेनुसार) घडली. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपींग (Xi Jinping) यांनी मदत आणि बचाव कार्याचे आदेश दिले असून सर्व खलाशांचा शोध घेण्यात यावे असे आदेशात म्हटले आहे. हे आदेश त्यांनी 17 मे रोजी दिल्याचे प्रसारमाध्यमांनी आपल्या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, चीनच्या सागरी शोध आणि बचाव केंद्राने संबंधित देशांना अपघाताची माहिती दिली होती आणि परराष्ट्र मंत्रालयाने ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, मालदीव, इंडोनेशिया, फिलीपिन्स आणि इतर देशांतील त्यांच्या शोधमोहिमेत सहभाग घ्यावा, असे अवाहन केले आहे.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, शानडोंग प्रांतातील पेंगलाई जिंगलू फिशरी कंपनी लिमिटेडच्या मालकीचे अससेले जहाज 16 मे रोजी पहाटे उलटले. "लुपेंग युआन्यु 028" असे या जहाजाचे नाव असून हे जहाज खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी बांधण्यात आले होते, असे वृत्त CCTV ने दिले आहे. समुद्रात मासेमारी करण्यासाठी समुद्रात उतरलेल्या या जहाजावर 39 लोक होते. त्यापैकी 17 चिनी क्रू मेंबर्स, 17 इंडोनेशियन आणि पाच फिलीपिन्सचे नागरिक आहेत. जे सध्या बेपत्ता आहेत. (हेही वाचा, Flash Floods in DRC: डीआरसी हादारले, अचानक आलेल्या महापूरात Bushushu, न्यामुकुबी गावातील 175 हून अधिक नागरिकांचा मृत्यू)

वृत्तसंस्था एएनआयने CGTN च्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, की, राष्ट्राध्यक्ष शी जिनपींग यांनी म्हटले आहे की, मच्छिमारांच्या बचावासाठी सर्व प्रयत्न केले पाहिजेत. यापूढे समूद्रात खोलवर मासेमारीला जाणाऱ्या मच्छिमारांच्या सुक्षेसाठी सुरक्षिततेच्या धोक्याच्या पूर्व सूचना, इशारे अधिक सतर्क आणि अत्याधुनिक पद्धतीन दिले जातील. तसेच, शी यांनी चिनी कृषी आणि ग्रामीण व्यवहार मंत्रालय, चीनचे वाहतूक मंत्रालय आणि शानडोंग प्रांत यांना परिस्थितीची पडताळणी करण्यासाठी आणि अतिरिक्त बचाव दल तैनात करण्यासाठी तात्काळ आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सक्रिय करण्याचे निर्देश दिले.